Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : सातबारा कोरा करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांमुळे वर्धा- चंद्रपूर मार्गावरची वाहतूक दुसऱ्या दिवशी पूर्णतः थांबली. जामठा पासून दोन्ही दिशेने २० – २० किलोमिटर दूर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. प्रहार जनशक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून सुरू झालेल्या या महा एल्गार आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी रात्रभर रस्त्यावर मुक्काम केला. सोबत आणलेली शिदोरी काढून रात्रीचे जेवण घेतल्यानंतर काही शेतकरी मैदानात तर काही शेतकरी रस्त्यावरच झोपले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यातील चार महामार्ग आंदोलक शेतकऱ्यांनी अक्षरशः अडवून धरले आहेत. वर्धा- चंद्रपूर सोबतच यवतमाळ, हैदराबाद, अमरावती आणि जबलपूरकडे जाणारी सर्व वाहने रस्त्यावर अडकून पडली आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेल्या चिचभवन पासून पुढे बुटीबोरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहनांमध्ये माल वाहतूक करणाऱ्या ट्रकसह बसेस आणि कारचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे वर्धा- चंद्रपूर, यवतमाळ, हैदराबाद, वरोरा, हिंगणघाटकडे दररोज प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. याचा सर्वाधिक फटका दुसऱ्या दिवशीही या मार्गावरी रुग्णालयांना बसला.

सगळे पोलीस बल वर्धा मार्गावर

सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर बुधवारी लोहमार्ग वाहतूकही बंद करू, असा इशारा प्रहार संघटनेने दिल्याने धास्तावलेल्या गृहमंत्रालयाने संपूर्ण पोलीस फौजफाटा वर्धा मार्गावर उतरवला आहे. स्वतः पोलीस आयुक्त रविंद्र आंदोलनस्थळी दाखल झाले.

पर्यायी मार्गावरील पेट्रोलपंप कोरडे

वर्धा मार्गावरील आंदोलनामुळे हैदराबाद, चंद्रपूर, हिंगणघाट कडून येणारी वाहन गिरड – उमरेड मार्गे नागपूरात प्रवेश करत आहे. तर काही वाहने बोर, हिंगणा मार्गेही येत आहेत. असा लांबचा प्रवास करीत असताना अनेक वाहनांचे पेट्रोल डिझेल संपत आहे. नागपूर उमरेड महामार्गावरील ५ ते ६ पेट्रोल पंप सध्या कोरडे पडले आहेत. या पंपावर पेट्रोल आणि डिझेल संपल्यामुळे अनेक वाहन चालकांना मानसिक त्रास सोसावा लागत आहे. यावेळी एका कारचालकाच्या चार चाकी पेट्रोल संपल्यामुळे गाडी पेट्रोल पंप वरच बंद पडली आणि त्याने मित्राला फोन करून मदती ची मागणी केली आहे.

रुग्णवाहिकांची चाकेही थांबली

कुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे सकाळी १०.३० च्या सुमारास वर्धा मार्गावरील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), नॅशनल कँन्सर इन्स्टिट्यूट, केअर, विवेकानंद मिशन सारकी महत्वाची रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यांमधून संदर्भीत करण्यात आलेली अथवा अतिदक्षता विभागाच्या सोयीची गरज असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असते. मात्र वर्धा मार्गावरील यारुग्णालयांकडे जाणारे सर्व मार्ग बंद असल्याने रुग्णांचे आतोनात हाल होत आहेत. विनवण्या करूनही आंदोलक रुग्ण वाहिकांनाही रस्ता मोकळा करून द्यायला तयार नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागत आहे.