वर्धा : जन्मभूमी वर्धा व कर्मभूमी पुणे असलेल्या बजाज समुहाने वर्धेशी आपली नाळ कायम जोडून ठेवली आहे. त्यांच्या समुहाची शिक्षा मंडल ही संस्था दर्जेदार शिक्षणाने परिचित आहे. आता याच संस्थेचे बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय हे राज्यात पहिल्या पाचमध्ये असल्याचा दावा संस्था करते. याच महाविद्यालयात ‘बजाज अभियांत्रिकी कौशल्य प्रशिक्षण’ दिले जाणार आहे. त्यासाठी पहिलीच अशी कर्मशाळा १५ कोटी रुपये खर्चून २५ हजार चौरस फूट जागेवर उभी होत आहे. अशा प्रकारची येत्या जानेवारीत कार्यरत होणारी ही देशातील तिसरी प्रशिक्षण संस्था ठरणार असल्याचे संस्था सचिव संजय भार्गव यांनी सांगितले.

हुशार विद्यार्थ्यांना सुविधायुक्त पण महागड्या महाविद्यालयात प्रवेश घेणे शक्य होत नाही. कर्मशाळेतून मोठ्या उद्योगांना आवश्यक असलेले कुशल अभियंते तयार होतील. याचा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार असल्याचे भार्गव म्हणाले. प्रशिक्षण हे त्यांना परिपूर्ण करणार. मेकट्रोनिक्स, सेन्सर टेक्नोलॉजी, रोबोटिक्स व स्मार्ट मॅन्युफॅक्चरींग या चार शाखेत पदवीसाठी सहा महिने, तर पदविकासाठी चार महिन्यांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम राहणार.

हेही वाचा – “शरद पवार म्हणजे जपानी बाहुली, प्रत्येकाला वाटतं…”; नितीन गडकरींचं भुवया उंचावणारं वक्तव्य

हेही वाचा – अकोला : संभाजी भिडेंच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या; वंचित आक्रमक होत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संस्थेच्या विद्यार्थ्यांना ते शिकत असतानाच तर इतरांना पदवी पूर्ण केल्यावर प्रशिक्षण मिळणार. या कर्मशाळेत जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट उपकरणे राहणार असून रोबोट्स बाहेरून आयात केले जाणार आहेत. तिसऱ्या वर्षापासून ४८० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणात सहभागी होणे शक्य होईल. विदर्भासह छत्तीसगड व मध्यप्रदेशातील विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतील. ‘बीआयटी’ मधून कुशल अभियंते घडवून त्यांना रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा हा भरीव प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.