लोकसत्ता टीम

चंद्रपूर: जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात दोन बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. बदलापूरची घटना ताजी असतांना बल्लारपूरात एका अल्पवयीन मुलीवर व एका मंतिमंद मुलींवर बलात्कार केल्याची घटना मंगळवार २ सप्टेंबरला उघडकीस आली आहे. दरम्यान अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कारामुळे बदनामीच्या भीतीने पिडीत मुलीने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

बल्लारपूर येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार दिवसांपूर्वी व तिच्या कथित प्रियकराने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शिवम दिनेश दुपारे (२२) रा. मौलाना आझाद वार्ड याला अटक केली. मात्र, ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलीने बलात्काराची लज्जा व बदनामीच्या भीतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे खळबळ उडाली असून तिची आत्महत्या कि, हत्या याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तसेच बल्लारपूर शहरातील सिंग नाईक वॉर्डात राहणाऱ्या मंतिमंद मुलींवर चंदू बालू भुक्या (५८) यांने घरात कुणीही नसल्याची संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. पिडीतेचे आई घरी आल्यावर पिडीता नग्न अवस्थेत खाटेवर आढळून आली. घरमालकाने चंदू भुक्या नावाचा व्यक्तीं तिच्या खाटेवर झोपून असल्याचे सांगितले.

आणखी वाचा-Video : चंद्रपूर शहरात बिबट्याचा धुमाकूळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पिडीतेच्या आईने याबाबत बल्लारपूर पोलिसात तक्रार दाखल केली. वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपी चंदू बालू भुक्या याला अटक केली आहे. एकाच दिवशी दोन बलात्काराच्या घटनामुळे चंद्रपूर शहर हादरून गेले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम, पोलिस उपनिरीक्षक गोविंद चाटे करीत आहेत.