नागपूर : संभाजी भिडे प्रकरणाची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. संभाजी भिडे आमचे कार्यकर्ते नाही आणि सरकारने त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने त्यांची दखल घेतल्यावर आंदोलन करण्याची गरज नाही. नियमात असेल त्याप्रमाणे कारवाई होईल, असे मत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

बावनकुळे नागपूरला प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, भिडे हे भाजपाच्या कार्यकारी समितीत नाही किंवा आमचे कार्यकर्ते नाही. त्यामुळे भाजपाशी त्यांचा जो संबंध जोडला जातो तो चुकीचा आहे. त्यांचे वेगळ व्यक्तिमत्त्व आहे. महात्मा गांधींचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मात्र, काँग्रेस व इतर विरोधी पक्ष त्यावरही राजकारण करत आहेत. विरोधकांचे कामच राजकारण करण्याचे, पण सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारच्या कारवाईसाठी वाट बघितली पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले. यशोमती ठाकूर यांना दुसरे कोणी दिसत नसल्याने त्या भाजपावर आरोप करत आहेत. त्यांना धमकी येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करावे, हे ठीक आहे. पण प्रत्येक गोष्टीला भाजपाशी जोडणे हे योग्य नाही.

हेही वाचा – VIDEO: महापुरुषांचा अपमान करणारे संभाजी भिडे गजानन महाराजचरणी नतमस्तक

हेही वाचा – “मुख्याधिकारी हटाव”साठी एकवटले यवतमाळकर; नगर पालिकेत लोकांनीच केली जनसुनावणी, समस्यांची शेकडो निवेदने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी अजित पवार यांच्याबद्दल जे बोललो ते छगन भुजबळ यांनी समजून घेतले पाहिजे. महायुतीचे उमेदवार उभे राहतील तेव्हा महायुतीचे सगळे नेते प्रचाराला येतील. भुजबळ उभे राहतील तेव्हा आम्ही सगळे नेते त्यांच्या प्रचाराला जाणार. त्यांनी बोलण्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. विपर्यास कोणीच करू नये. महायुतीत एकमेकांच्या उमेदवाराचा प्रचार करण्यात येईल. आमच्या मंचावर ते येतील. त्यांच्या मंचावर आम्ही जाऊ. ही महायुती आहे, असा माझा बोलण्याचा अर्थ असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.