लोकसत्ता टीम

नागपूर: महायुतीमध्ये असणारे शिवसेनेचे आमदार परत उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत. विशेष म्हणजे, असा विचार करणेही “मुंगेरीलाल के हसीन सपने” म्हटले पाहिजे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
farmer near chakan planted 66 cannabis plants in corn field
पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते. बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे व त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना आजही दिवास्वप्न पडत आहेत. याचेही आश्चर्यच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिदे उत्तम सरकार चालवत आहेत. एवढ्या चांगल्या सरकारमधील आमदारांना परत जाण्याची शक्यताच नाही. भाजपने २० लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांचा प्रचाराबाबत चर्चा करण्यासाठी महायुतीची बैठक होणार आहे. ५१ टक्के मते कशी मिळतील यासाठी नियोजन करणार आहोत. ज्या जागांवर एकमत झाले आहे, त्या जागा घोषित करण्याची सहकारी पक्षांना मुभा आहे. महायुतीचे तिन्ही नेते एकत्र येतील व लवकरच उर्वरित जागांवर एकमत होईल. भंडारा- गोंदिया आणि गडचिरोली या जागा भाजपच्याच आहेत त्यावर भाजप-महायुती एकत्र लढणार, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

आणखी वाचा- गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शहरात दिवसाढवळ्या गोळीबार… वाचा नेमके काय घडले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचा संकल्पाला साथ देण्यासाठी येणाऱ्यांचे स्वागत आहे. राज ठाकरे जर येत असतील, तर त्यात वावगे काहीच नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राजू पारवे त्यांना जिल्हा नियोजन समिती अंतर्गत असलेल्या प्रस्तावांच्या संदर्भात भेटले. पारवे यांनी मलाही फोन केला होता. प्रकाश आंबेडकर हे आमच्या विचारांशी सहमत नाहीत, राजकारणात कुणी कायमचा शत्रू अथवा मित्र नाही. स्थानिक राजकारणामध्ये काही मतभेद असतात विजय शिवतारे व अजित पवार यांच्यातील वाद व मतभेट मिटतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा १६ मार्चला सायंकाळी नागपूरला येणार आहेत, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.