भंडारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणाचे धागेदोरे भंडारा जिल्ह्यापर्यंत पोहचले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी पुणे गुन्हे अन्वेषण शाखेने वरठी येथून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून दोन जण फरार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीकडून २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ४० लाख द्या प्रश्नपत्रिका देतो, असे या फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अशातच काल पुणे गुन्हे अन्वेषण शाखा आणि नागपूर गुन्हे शाखेची चमू भंडारा येथे पोहचली. एमपीएससी परीक्षा घोटाळा प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील काही तरुण आणि महिला यात गुंतल्याचा संशयावरून पोलिसांची चमू येथे पोहचली. या प्रकरणात एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून दोन जण फरार असल्याची माहिती आहे. या विषयी अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या संदर्भात माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये घोटाळ्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येतात. कधी प्रश्नपत्रिकेत तर कधी उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस येतात. कधी पैसे घेऊन प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवले जाते. तर कधी एमपीएसी परीक्षेत बोगस परीक्षार्थींकडून परीक्षा दिल्याच्या घोटाळा उघड होतो. वर्षभरापूर्वी चर्चेत असलेले आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर स्पर्धा परीक्षा देताना बनावट कागदपत्रे वापरल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या स्पर्धा परीक्षावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.