भंडारा : तुमसर तालुक्यातील भेंद्रे खाई या गावातील एका गर्भवतीस प्रसुती कळा सुरू झाल्या. तिला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका आली मात्र रुग्णालयाकडे जाणाऱ्या गावातील चिखलमय रस्त्यात रुग्णवाहिका अडकली. अशाच प्रसुती कळाच्या वेदनेने विव्हळत या गर्भवतीने होणाऱ्या बाळाच्या जिवासाठी चिखलातून कशीबशी पायी वाट काढली.
नऊ महिन्याची गर्भवती असलेल्या एका गर्भवतीला प्रसूती कळा सुरू झाल्या. तिला रुग्णालयात दाखल करण्याकरिता रुग्णवाहिका बोलावण्यात आली. काही वेळातच रुग्णवाहिका गावात पोहोचली. मात्र, ऐन पावसाळ्यात गावात करण्यात आलेल्या अर्धवट कामामुळं रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलात रुग्णवाहिका फसली. यामुळे गरोदर महिलेला चिखलातूनच पायी वाट काढत जावे लागले.
ही घटना तुमसर तालुक्यातील भेद्रे खाई तामसवाडी या गावात घडली. आदिवासी वस्ती पाड्यांवर रस्त्यांअभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र नेहमीच पाहण्यास मिळत असते. मात्र आज हे चित्र भंडारा जिल्ह्यात पाहण्यास मिळाले आहे. तुमसर तालुक्यातील भेंद्रे खाई या गावातील पवन तिवाडे यांच्या पत्नीला प्रसुती कळा जाणवू लागल्या होत्या. यामुळे लागलीच रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन करण्यात आला.
चिखलात फसली रुग्णवाहिका…
काही वेळातच रुग्णवाहिका गावात दाखल झाली. यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका आली. मात्र पावसाळ्याच्या दिवसात गावातील अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामामुळे सर्वत्र चिखल झालेला आहे. या चिखलात रुग्णवाहिकेचे चाक फसले. यामुळे चिखलात फसलेल्या रुग्णवाहिकेला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी धक्का मारून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग झाला नाही.
ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना…
रुग्णवाहिका चिखलात फसून असल्याने महिलेला चिखलातून कशीबशी पायी वाट काढावी लागली. चिखलातून रुग्णवाहिका न निघाल्याने शेवटी रुग्णवाहिका गावातील ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर करण्यात आलेल्या अर्धवट कामामुळे गर्भवती महिलेला चिखलातून वाट काढावी लागल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप बघायला मिळाला.