भंडारा : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने भंडारा जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झाले आहे. पावसाने सर्वत्र नदी नाले ओसंडून वाहत असल्याने अनेक मार्ग वाहतुकीस बंद झाले आहे. जिल्ह्यातील आंतरराज्यीय मार्गासह तब्बल ८० रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक १६४.७ मिमी पावसाची नोंद लाखांदूर तालुक्यात करण्यात आली असून ४० मंडळापैकी सर्वाधिक सिहोरा येथे ३४०. ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातही तालुक्यांमध्ये पुराचा फटका बसला आहे.

लाखांदूर तालुक्यात ओपारा गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून प्रशासन येथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याशिवाय सिहोरा, बपेरा या गावांना पुराचा पाण्याने विळखा घातला आहे. भंडारा शहरातही खात रोड, भोजापुर, ग्रामसेवक कॉलनी, गणेशपूर अशा अनेक वस्तीमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. बेला टोली येथे १४ घरांमध्ये पाणी घुसल्याने तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. पहेला सर्कल मधील गोलेवाडी ते डोंगरगाव पुलावर पाणी असल्याने हा पूल वाहतुकीस बंद आहे.

८० मार्ग बंद..

भंडारा ते कारधा (लहान पुल)

खमारी ते माटोरा

दाभा ते कोथुर्णा

शहापूर ते मारेगाव

गोलेवाडी ते डोंगरगांव

पहेला ते चोवा

उसरीपार ते मौदी

चोवा ते उसरीपार

आंबाडी ते सिल्ली

सोनेगाव ते विरली

अड्याळ ते विरली

पिंपळगाव ते सोमनाळा

मेंढेगाव ते साते पाट

बेटाळा ते पवनी

सोनेगाव ते विरली

भेंडाळा ते मोखारा

कोंढा ते बेलाटी

मेडेगाव ते काकेपार

कोदूर्ली ते धानोरी

भेंडाळा ते मोखारा

ब्रम्हे पाचेवाडी नाला

पवनी ते सिरसाळा

गोंदेखारी ते टेमनी

चुल्हाड ते सुकळी नकुल

कर्कापूर ते रेंगेपार

कर्कापूर ते पांजरा

तामसवाडी ते सीतेपार

सिलेगाव ते वाहनी

सुकळी ते रोहा

तामसवाडी ते येरली

उमरवाडी ते सीतेपार

येरली ते पीपरा

उमरवाडा ते तामसवाडी

तुमसर ते येरली

परसवाडा ते सिलेगाव

बपेरा ते बालाघाट (पुल)

गोंदेखारी ते चांदपूर

उसर्रा ते टाकला

डोंगरगाव ते कान्हळगाव ( सी.)

ताडगाव ते सिहरी

पिंपळगांव ते कान्हळगांव

अकोला ते वडेगाव

आंधळगांव ते आंधळगांव पेठ

भिकारखेडा ते विहीरगांव

दहेगाव ते रोहना

टांगा ते विहीरगांव

सुकळी ते रोहा

दहेगाव ते रोहना

विर्शी ते उकारा

वांगी ते खोबा
न्याहारवानी ते कटंगगधारा
सराटी ते चिंचगाव

पालांदूर ते निमगाव
गराडा ते मुरमाडी
पोहरा ते गडपेंढरी
पालांदुर ते निमगाव
नवीन मरेगाव ते जुना मरेगाव
पालांदुर ते ढिवरखेडा

किन्ही ते मांढळ
धर्मापुरी ते बारव्हा
मानेगाव ते बोरगाव
आसोला ते आथली
सावरगाव ते नांदेड<br>कुडेगाव ते गवराळा
किन्हाळा ते मळेघाट
नवीन ईटांचे ते जुना ईटन
लाखांदूर ते पिंपळगाव
परसोडीत ते तई
पाऊलदवणा ते तई
विरली डांबी ते गवराडा
लाखांदूर ते वडसा
मांढळ ते दांडेगाव
मुरमाडी ते मानेगाव
मुरमाडी ते दहेगाव
मांढळ ते दांडेगाव
मांढळ ते भागडी
बारवा ते धर्मापुरी
तीरखूरी ते पालेपंढरी
मासड ते सरांडी बु
सरांडी बु ते किनी

आज पुजारीटोला धरणाची ६ तर संजय सरोवरची २ दारे उघडण्यात आली आहे. गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे कालपासून उघडण्यात आले असून १४९५६.३२ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धापेवाडा धरणातून पाण्याचा मुक्त प्रवाह सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारधा पुलावर ५ फूट पाणी..

कारधा येथील पुलावरून आज सुमारे पाच फूट पाणी प्रवाहित होत आहे. त्यामुळे आजुबाजूच्या सखल भागांत पाणी शिरले आहे. पुलावरून धोक्याच्या पातळीपेक्षा १.६ मिटर अधिक पाणी वाहत आहे.