बुलढाणा: भेंडवळ येथे करण्यात येणारी घट मांडणी व अन्य भाकिते अवैज्ञानिक आहेत. तसेच उद्या राजकीय भाकीत केल्यास थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिला आहे.

हेही वाचा – नागपूर : ‘त्या’ ऑटो चालकाविरुद्ध ऑटोरिक्षा चालक संघटना सरसावली

हेही वाचा – आनंदवार्ता ! वैद्यकीय शाखेत नवीन अभ्यासक्रम, पदव्युत्तर जागांमध्येही होणार वाढ

भेंडवळची घटमांडणी आज शुक्रवारी संध्याकाळी करण्यात येणार आहे. यावरची विविध भाकिते उद्या शनिवारी करण्यात येणार आहेत. या घटमांडणीच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असतो आणि त्यानुसार वर्षभराचे नियोजन शेतकरी करत असतात. परंतु, अ. भा. अनिसंचे जिल्हा संघटक अभयसिंह मारोडे यांनी आज माध्यमाशी बोलताना म्हटले की, ही घटमांडणी थोतांड व अवैज्ञानिक आहे. शेतकऱ्यांनी या मांडणीच्या भाकितांवर विश्वास ठेवू नये. या घटमांडणीत राजकीय भाकीतसुद्धा केली जातात. यावर्षी देशभरात लोकसभा निवडणुका होत असून सर्वत्र आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे जर राजकीय भाकीत किंवा अंदाज व्यक्त केला गेला तर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही मारोडे यांनी दिला आहे.