नागपूर – मागून आलेल्यांना मंत्रीपद मिळतात आणि आम्ही वाट पाहत राहतो, असे भाजपाचे आमदार खाजगी भेटीत सांगतात. त्यातील काही आमच्या संपर्कात असल्याचे राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. अनिल देशमुख नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

शपथविधीला १२ दिवस झाले तरी खाते वाटप झाले नाही. राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असून त्यांना सरकारमध्ये कोणी वाली नाही. भाजपा राजकीय पक्ष तोडफोडीचे राजकारण करत आहे. लोक त्यांना याबाबत निवडणुकीत जाब विचारतील. बच्चू कडू यांनी महायुती सरकारला अल्टिमेटम दिला आहे. अनेकांना मंत्री आणि महामंडळाचे आश्वासन देण्यात आले होते. ते त्यांना मिळत नाही. त्यामुळे ते अस्वस्थ आहे, असेही देशमुख म्हणाले.

हेही वाचा – “जनता उपाशी, सरकार तुपाशी”, नाना पटोले यांचे विधान; म्हणाले, “राष्ट्रपती राजवट लावा”

हेही वाचा – वाशीम : बिडीओंनी फिरविला सीईओंचा आदेश! हनवतखेडा ग्रामसेवक निवडताना वरिष्ठांचा आदेश डावलला; उपसरपंचाची तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ३ लाख २७ हजार कोटींचे उद्योग महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले आहे. हे जर खरे असेल तर त्याची सविस्तर माहिती त्यांनी द्यावी. काही तरी माहिती सांगून दिशाभूल केली जात आहे. केवळ पोकळ घोषणा करू नये, असेही देशमुख म्हणाले.