scorecardresearch

Premium

अश्लील चित्रफित प्रसारित करणाऱ्या बहिणीच्या प्रियकराचा खून

वस्तीत बदनामी झाल्यामुळे युवतीच्या भावाने तिच्या प्रियकराचा लाकडी दांडा आणि दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना मंगळवारी दुपारी गिट्टीखदानमध्ये घडली.

Brother, Murder, sister, boyfriend, porn video
अश्लील चित्रफित प्रसारित करणाऱ्या बहिणीच्या प्रियकराचा खून

नागपूर : बहिणीशी प्रेमसंबंध ठेवल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने वस्तीतील व्हॉट्सअप ग्रूपवर प्रसारित केली. वस्तीत बदनामी झाल्यामुळे युवतीच्या भावाने तिच्या प्रियकराचा लाकडी दांडा आणि दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना मंगळवारी दुपारी गिट्टीखदानमध्ये घडली. कपील डोंगरे (३७, गंगानगर, गिट्टीखदान) असे मृत युवकाचे नाव आहे.

कपील डोंगरे हा अविवाहित असताना त्याचे वस्तीतील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. यादरम्यान त्या युवतीचे रायपूरच्या युवकाशी लग्न झाले. तर कपिलनेही बालाघाटमधील युवतीशी लग्न केले. दोघांचाही सुखी संसार सुरु होता. कपीलने गिट्टीखदानमध्ये मोठे मोबाईल विक्रीचे दुकान टाकले. गेल्या काही दिवसांपूर्वी कपील हा रायपूरला गेला. तेव्हा त्याने विवाहित प्रेयसीला फोन केला. तिला भेटायला एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे त्यांनी एकमेकांच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान कपीलने तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत काढली. गेल्या काही दिवसांपूर्वी कपील आणि त्या युवतीचा एक फोटो त्याच्या पत्नीला दिसला. त्यावरून पती-पत्नीत वाद होत होता. पत्नीने त्या युवतीला फोन करून रागवले. तर कपीलच्याही कुटुंबियांना प्रेमप्रकरणाबाबत सांगून गोंधळ घातला. काही नातेवाईकांनी तिची समजूत घालून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती मानायला तयार नव्हती. तिने पतीच्या मोबाईलमधून प्रेयसीसोबतचे काही अश्लील छायाचित्र आणि चित्रफीती काढल्या आणि थेट वस्तीतील एका व्हॉट्सअप ग्रूपवर प्रसारित केल्या. त्यामुळे त्या युवतीची वस्तीत बदनामी झाली.

rape case filed against the boyfriend
प्रेम प्रकरणाची कुणकुण पोहचली घरात… अन् प्रियकराविरुद्ध गुन्हा
ganesh ustav to jai shree ram
बाप्पा मोरया ते जय श्रीराम!
minor girl video viral after lured into love trap
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून चित्रफीत समाज माध्यमावर सार्वत्रिक
victim girl was raped by her brother
अल्पवयीन पीडितेचा अमानवीय छळ प्रकरण: ‘त्या’ मुलीवर सख्ख्या भावानेही केला बलात्कार

हेही वाचा… विकृतीचा कळस! भिलाईतील नराधमाचा गायीवर लैंगिक अत्याचार; गोंदिया आरपीएफने आवळल्या मुसक्या

हेही वाचा… भंडाऱ्यातले एक माकड लय भारी, त्याची हॉटेलिंगची तऱ्हाच न्यारी; दर मंगळवार आणि शनिवारी बुक असतो टेबल, जिलेबी आणि समोसासह…

अशी घडली घटना

युवतीचा भाऊ राजू याच्याकडेसुद्धा ती चित्रफीत आली. बहिणीसोबचे अश्लील चित्र बघून त्याने थेट कपीलचे घर गाठले. कपीलवर काठीने हल्ला केला आणि दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर थेट गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पोहचला. बहिणीच्या इभ्रतीचे धिंडवडे काढल्यामुळे कपीलला संपविल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Brother murder sisters boyfriend who broadcast her porn video adk 83 asj

First published on: 31-05-2023 at 15:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×