भुसावळ विभागातील जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे काम सुरू असल्याने नागपूरहून मुंबई, पुणे, गोवा, अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या चार दिवस रद्द करण्यात आल्या आहे. ३ ते ६ डिसेंबर या कालावधीत या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची अडचण होणार आहे. मात्र या मुद्यावरुन बहुजन समाज पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर वेगळाचा आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- काय आहे ‘आधार ॲट बर्थ’? जाणून घ्या नागपूर जिल्हाधिका-यांचे निर्देश

मध्य रेल्वे नागपूर विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) यांना यासंदर्भात निवेदन दिले जाणार आहे आणि मागणी केली जाार आहे की, ३ ते ६ डिसेंबरला मुंबई मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या सुरू ठेवून रेल्वे मार्गाचे काम १० ते १३ डिसेंबरच्या दरम्यान करावे. या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्यावतीने केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार व मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक, मुंबई यांना निवेदन पाठविले जाणार आहे.

हेही वाचा- ‘ग्रामहित’च्या कष्टाचा ‘ग्लोबल’ गौरव! ‘फोर्ब्स’च्या मुखपृष्ठावर झळकली यवतमाळची तरुणी

केंद्र सरकारवर बसपाचा आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी मुंबईला जाऊन अभिवादन करणाऱ्या लाखो अनुयायांना थांबवण्यासाठी, तसेच अनेक वर्षापासून कासव गतीने सुरू असलेल्या इंदू मिलच्या जागेवरील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या बांधकामाचे बिंग फुटू नये म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रेल्वे मंत्रालयाने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचे षडयंत्र केले. या षडयंत्राचा भाग म्हणून ३ डिसेंबर ते ६ डिसेंबरच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या रद्द केल्या, असा आरोप बसपाचे उत्तम शेवडे यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsp has accused the central government of canceling many trains going to mumbai to prevent crowding at chaityabhoomi nagpur dpj
First published on: 24-11-2022 at 16:20 IST