बुलढाणा : बुलढाण्यातील मराठा क्रांती मोर्च्याला प्रारंभ होण्यापूर्वी संभाव्य दुर्घटना टळली! जिजामाता व्यापार संकुलमधील गॅलरीतून एका आंदोलकाने खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याठिकाणी तैनात स्वयंसेवकांनी त्याला वेळीच रोखल्याने संभाव्य दुर्घटना टळली. यामुळे आयोजकांसह समाज बांधवांनी सुटकेचा श्वास सोडला.

हेही वाचा : अबब…नागपुरात दीड लाखाचा लाकडी बैल… काय आहे वैशिष्ट्य?, वाचा…

pune army jawan detained
पुणे: लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा जवान ताब्यात; लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई
Watchman who tried to kill woman after failed rape attempt arrested from Bihar
मुंबईतील प्राणीप्रेमी महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला बिहारमधून अटक
Anand mahindra share motivation video
“हा चिमुकला कुणाच्या आधाराशिवाय प्रयत्न करतोय तर तुम्ही का नाही?” महिंद्रांनी शेअर केलला VIDEO विचार करायला भाग पाडेल
akola, uddhav thackeray
अकोला: महिला सरपंचाला शिवीगाळ, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर ॲट्राॅसिटी; राजकीय दबावातून गुन्हा दाखल केल्याचा…
fire, slipper , factory,
वसईच्या चिंचोटी येथे चप्पल तयार करणाऱ्या  कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू
Case against Geeta Khare secretary of Vighnaharta Trust in Dombivli
डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव गीता खरे यांच्यावर गुन्हा; गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शेतघरात आश्रय दिल्याचा ठपका
pune man petrol on traffic police marathi news
धक्कादायक! दुचाकी अडवल्याचा राग आल्याने वाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
24 held in seoni cow slaughter case in mp
गोहत्येवरून २४ जणांना अटक; मध्य प्रदेश पोलिसांची कारवाई, धार्मिक सलोखा बिघडवण्याचा हेतू

जयस्तंभ चौक परिसरातील जिजामाता व्यापार व क्रीडा संकुलमध्ये जिल्ह्यातील समाज बांधव जमले. तिथून मोर्च्याला सुरुवात करण्याचे नियोजन होते. दरम्यान यावेळी मैदानात गर्दी झाल्याने काही जण प्रेक्षक गॅलरीत गेले. यापैकी एकाने तिथून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वयंसेवकांनी त्याला वेळीच पकडले. संभाजी भाकरे पाटील ( नांदुरा) असे त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. त्याची समजूत घालण्यात आल्यावर पुढील मोर्चा सुरळीत पार पडला.