बुलढाणा : गावानजीक असलेल्या शेतात घर बांधून आपआपल्या कुटुंबासह राहणाऱ्या दोन शेतकरी भावासाठी शनिवारची रात्र त्यांनी मेहनतीने उभे केलेल्या संसाराची राख रांगोळी करणारी ठरली! दोघा भावांच्या परिवारातील सदस्य मात्र सुदैवाने बचावले. सिलिंडर चा स्फोट होऊन झालेल्या अग्नी तांडवाने काही तासातच त्यांचा संसार होत्याचा नव्हता झाला.यामुळे प्राण वाचले असले तरी दोघा भावावर नव्याने संसाराची जुळवा जुळव करण्याची दुर्देवी वेळ आली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा नजीकच्या शिवणी शिवारातील शेतात सात डिसेंबरच्या रात्री हा दुर्देवी घटनाक्रम घडला.एकनाथ टाले आणि त्याचा भाऊ शिवाजी टाले यांची शेतात शेजारी शेजारी घर आहेत. रात्री साडेसात ते आठ वाजे दरम्यान एकनाथ टाले यांच्या घरात स्वयंपाक सुरू असताना गॅसचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या भीषण आगीने शेजारी असलेल्या शिवाजी टाले यांच्या घराला देखील वेढा घातला. आग भडकल्याने त्यांच्या(शिवाजीच्या) घरातील गॅस सिलिंडर चा देखील स्फोट झाला.त्यामुळे आग लागतात घरातील मंडळी बाहेर पळाली. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत दोन्ही भावाचे कच्ची घरे क्षती ग्रस्त झाली. घरात साठवून ठेवलेला कापूस, सोयाबीनचे कट्टे, दाळ दाना कपडे, रोख रक्कम जळून खाक झाली. या आगीमध्ये दोन्ही भावाचे १८ लाखापेक्षा जास्त रुपयाचे नुकसान झाले सुदैवाने जीवित हानी टळली.या दोघा भावांचे संसार उघड्यावर पडले केवळ अंगावरचे कपडे राहिले बाकी सर्व जळून खाक झाले. त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे. त्यामुळे त्यांना आता संसार गाडा नवीन सुरु करावा लागनार आहे महसूल विभागाने पंचनामा केला त्यामूळे लागलेल्या आगीत दोन्ही भावाचे घरे जळून खाक झाली. धान्य, दाना पाणी, अंगावरचे कपडे, गृहोपयोगी साहित्य, वस्तू, दागिने ,नगदी रक्कम, इलेकट्रोनिक वस्तू , कृषी साहित्य, माल आदी भस्मसात झाले. शिवाजी यांच्या घरातील बियाणे आणि साधा ३२ क्विंटल कापूस २० क्विंटल सोयाबीन १५ क्विंटल गहू एक लाख ६० हजार रुपये रोख सोन्या चांदीचा दागिने आणि घरातील कुलर, टीव्ही, पलंग, मोबाईल यासह संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. त्यांचे जवळपास ८ लाख ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले.दुसरीकडे एकनाथ टाले यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या घरातील सोयाबीन, कापूस, संसार उपयोगी वस्तू असे जवळपास ९ लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दोघे भावाचे मिळून सुमारे १८ लाख ४६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Three generations of 74 Panvel tribal families remain homeless
तीन पिढ्यांच्या वास्तव्यानंतर आदिवासी हक्काच्या घरापासून वंचित, पनवेलच्या विकास आराखड्यातील हरकतीवर सुनावणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
some bad decisions happened on eknath shinde tenure as chief minister says forest minister ganesh naik
एकनाथ शिंदे यांच्या कालखंडात काही चुकीच्या गोष्टी घडल्या; वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
Nagpur,couple made video before committing suicide on their wedding anniversary
नागपूर : लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची आत्महत्या, अपत्य होत नसल्यामुळे…
Akola Police, Akola Police missing persons search,
अपहृत व हरवलेल्या ४९८ जणांच्या चेहऱ्यावर फुलले ‘मुस्कान’, अकोला पोलिसांनी १० वर्षांपासून बेपत्ता असलेल्या…
Ajnup Gram Panchayat , Shahapur Taluka,
ठाणे : जमिनीच्या वादातून माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला
two-wheeler road accident Sukali village nagpur
नागपूर : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोन ठार

हेही वाचा…नवेगावबांध जलाशयांवर परदेशी पाहुण्यांचा स्वच्छंद विहार,पक्षी प्रेमींना पर्वणी

पंचनामा

घटनेची माहिती मिळताच सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे यांनी तात्काळ मंडळ अधिकारी प्रेमानंद वानखेडे ,तलाठी प्रभाकर बाविस्कर, निलेश किंगरे ,कोतवाल समीर पठाण यांना घटनास्थळी पाठवले.त्यांनी पंचनामा करून अहवाल तहसीलदार दिवटे यांच्याकडे सादर केला आहे . या आगीत जीवितहानी जरी झाली नसली तरी घरातील सर्वसामान जळून खात झाले. केवळ अंगावरचे कपडे बाकी राहिले त्यामुळे नुकसानग्रस्त दोन्ही भावांना शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचा…आजी आजोबांसोबत शिक्षण: युवा शिक्षकाचा अफलातून प्रयोग

माणुसकीचा प्रत्यय; गावकऱ्यांची मदत

दरम्यान त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी लोक वर्गणीतून त्या कुटुंबांना आर्थिक मदत केली. तसेच शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे केली आहे. तसेच ज्यांना मदत द्यायची असेल त्यांनी सरपंच यादव टाले व रवी वायाळ यांचेकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Story img Loader