बुलढाणा : सातारा जिल्ह्यातील फलटण चा पोलीस अधिकारी महिला डाक्टरच्या आत्महत्येने राज्यात गाजत असून त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अख्त्यारितील गृह विभाग बदनामी व वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. असाच दुर्देवी व पोलीस विभागाला कलंकित करणारा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने न्याय मागण्यासाठी आलेल्या युवकांस ठाण्यातील सिसिटीव्ही कॅमेरे बंद करून अमानुष मारहाण केली. यानंतर त्याला ठाण्यात बसवून ठेवले.
यामुळे अवमानीत झालेल्या व आपणास पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने अगतिक अवस्थेत त्या युवकाने व्हिडीओ तयार करून विष प्राशन केले. हा व्हिडीओ समाज माध्यमावर वेगाने व्हायरल होत असून पोलिसांच्या दबंगगिरी वरून समाज माध्यम मध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे जनमानस प्रक्षुब्ध झाले आहे.
फलटण येथील महिला डॉक्टरवर पीएसआयने अत्याचार केल्याची घटना राज्यभरात गाजत आहेत.तशीच खाकिला कलंकित करणारी घटना किनगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये घडली आहे.चोरीला गेलेली बैलजोडी परत मिळावी यासाठी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने फिर्यादीने बुलढाणा पोलीस अधिक्षक कार्यालय कडे तक्रार दिली .
सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने न्याय मागण्यासाठी आलेल्या युवकास ठाण्यातील सिसिटीव्ही कॅमेरे बंद करून अमानुष मारहाण केली. यानंतर त्याला ठाण्यात बसवून ठेवले. यामुळे अवमानीत झालेल्या व आपणास पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने अगतिक अवस्थेत युवकाने… pic.twitter.com/sQy4ngCgK3
— LoksattaLive (@LoksattaLive) October 30, 2025
अधीक्षक कार्यलयातून कारवाई करण्यासाठी फोन आल्याने संताव अनावर झालेल्या ठाणेदार संजय मातोंडकर याने फिर्यादी युवक पवन प्रल्हाद जायभाये याला पोलिस ठाण्यातच मारहाण केली. हा मुजोर अधिकारी एवढ्यावरच थांबले नाही तर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.
‘लाईव्ह’ विष प्राशन’
त्यामुळे फिर्यादी युवकाने विष प्राशन केले. त्याने याचा व्हिडीओ तयार करून ठाणेदाराच्या मनमानीची पोलखोल केली. माताेंडकरने लाथा मारल्या, बुक्यांचा मार दिला… तोंडात चपटा मारल्या…तुझी कंप्लेंट घेणार नाही, बैलगाडी देणार नाही… ते पैसे आणून दे…तुलाच पैसे द्याव लागेल… असा दम दिल्याचा आराेप फिर्यादीने व्हिडीओ मधून केला आहे. तसेच गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
आपण तक्रार करूनही न्याय मिळाला नाही, उलट ठाण्यात कॅमेरे बंद करून मारहाण करण्यात आली. यामुळे आपण विष घेत असल्याचे सांगून त्याने विषची बाटली तोंडाला लावल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
काय आहे प्रकरण?
किनगाव राजा पोलिस ठाणे अंतर्गत लिंगा देवखेड या गावातील पवन प्रल्हाद जायभाये या युवकाची बैलजोडी चोरीला गेली होती.ही बैलजोडी परत मिळावी यासाठी या युवकाने दोन तीन दिवस किनगाव राजा पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारल्या.मात्र कुठलीही कारवाई तर दूर साधी फिर्याद घ्यायलाही किनगाव राजा पाेलीस तयार नव्हते. अखेर न्याय या युवकाने पाेलीस अधीक्षकांच्या कार्यालयात धाव घेतली. पाेलीस अधीक्षक कार्यालयातून ठाणेदार संजय माताेंडकर यांना फोन आल्याने त्याने फिर्यादी युवकास ठाण्यात बाेलावले. विशेष म्हणजे पाेलिसांनी फिर्यादीस पाेलीस स्टेशनमध्ये बाेलावले तेव्हा ज्याच्यावर बैल गाडी नेल्याचा आरोप आहे ताे कारभारी सांगळे (रा जऊळका, ता सिंदखेड राजा )हा देखील तेथे हजर हाेता. यावेळी कॅमेरे बंद करून फिर्यादी युवकास बेदम मारहाण केली. गंभीर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या युवकावर जालना येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे खाकीला कलंक लावणाऱ्या ठाणेदार माताेंडकर याच्यावर कठाेर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.
