बुलढाणा: मेहकर तालुक्यातील दुधा या गावात झालेल्या धाडसी घरफोडीत तब्बल ४ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. यामुळे मेहकर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जानेफळ पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला आहे. दुधा येथील प्रेमकुमार रामराव सास्ते हे आपल्या परिवारासह घरात झोपले होते. यावेळी अज्ञात चोरट्यानी घराचे मागील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
हेही वाचा : नागपूर : मेट्रो प्रवाशांचा ऑनलाईन तिकीट खरेदीकडे कल, ही आहेत कारणे…
यानंतर कपाटमधील ४० हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा ४ लाख १५ हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.