नवरात्रीनिमित्त गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे रविवारी रात्री उशिरा घडली. विशाल पडधारिया ( ४७) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे.

हेही वाचा- नागपूर : ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच समपुदेशकाची नियुक्ती’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीर सावरकर चौकातील नवदुर्गा मंडळाच्या प्रांगणात गरबा खेळताना त्यांना अचानक भोवळ आली. इतर भाविकांनी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाबू भैय्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पडधारिया यांनी २५ वर्षापूर्वी जानेफळ नगरीत गरबा, दांडिया संस्कृती रुजवत अनेकांना गरबा खेळण्याचे धडे दिले. गरबा खेळतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. आज, सोमवारी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.