लोकसत्ता टीम

बुलढाणा : महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी शेगाव येथे गजानन महाराज समाधीस्थळी नतमस्तक झाल्यावर ते बुलढाण्यात दाखल झाले. साधेपणाने त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, आमदार राजेश एकडे हजर होते. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसच्या जयश्री शेळके या जिल्हा कचेरीत दाखल झाल्या.

आणखी वाचा-अकोल्यातील भाजप उमेदवार अनुप धोत्रेंचे उत्पन्न किती? जाणून घ्या सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, बुलढाणा मतदारसंघातील लढत गद्दार विरुद्ध खुद्दार, अशी लढाई आहे. करोडपती विरुद्ध साधा शेतकरी पुत्र, असा हा लढा आहे. राजकीय दादागिरी, मनमानी, विकासाच्या नावाने होणाऱ्या भ्रष्टाचारविरुद्धची लढत आहे. यात आघाडी जिंकणारच ही काळ्या दगडावरची रेष आहे. यापूर्वी खेडेकर हे शेगावात दाखल झाले. गजानन महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाल्यावर त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.