नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (वेकोलि) कंपनीच्या एका अधिकाऱ्याला एक लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने अटक केली. गौतम बसुतकर, असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याला न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. गौतम बसुतकर हा यवतमाळ जिल्ह्यातील वणीजवळील घोंसा ओपन कास्ट माईन येथे उपक्षेत्र व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे.

हेही वाचा – नागपूर: मेयोत त्वचारोग विभागाचा वार्ड दाखवण्याची बनवाबनवी उघड; संतप्त परिचारिकांद्वारे काम बंद

हेही वाचा – नागपूर: भारतातील ५ हजार परिचारिकांना इंग्लंडमध्ये संधी- मेहता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदाराला वणी येथील खाणीतून कोळसा काढण्यासाठी मंजुरी आदेश हवा होता. त्यासाठी गौतम याने ३ लाख २३ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, त्यांनी लाच देण्यास नकार दिला. त्यानंतर गौतम याने एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. गौतम याला एक लाखाची लाच स्वीकारताना सीबीआयने अटक केली. त्याला न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गौतम याच्या घरातून काही महत्त्वपूर्ण दस्तावेज ताब्यात घेतले आहे, असे सूत्रांनी सांगितले.