नागपूर: केळीबीग मार्गावरील बुधवार बाजार येथे सुरू असलेल्या महानगर पालिकेच्या निर्माणाधीन बी पार्क प्रकल्पात शनिवारी मोठी दुर्घटना टळली. प्रकल्पाला लागून बनवलेले खांब आणि बीम भिंतीसह ढासळल्याने तीन जण जखमी झाले. प्रकल्पाच्या कामासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन न केल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

प्रकल्पावर पोकलेनने माती उपसली जात असताना ही घटना घडली.  माती काढताना बाह्य भागातील भिंतीचा काही भाग खाली ढासळला. माती दोन्ही पोकलेनवर पडली. त्यामध्ये तीन जण जखमी झाले.  अजित परमनिक, चिंटू कुमार (पोकलेन चालक) आणि हेल्पर मनीष नागेश्वर अशी  जखमींची नावे आहेत. त्यांना तातडीने मेयो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

  वरिष्ठ अभियंता सुनील काठे यांनी याला दुजोरा देताना सुदैवाने यात जीवित हानी झालेली नसल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने गंजीपेठ आणि काॅटनमार्केट येथून दोन गाड्या घटनास्थळी रवाना केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 प्रकल्पाला लागून असलेल्या जुन्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. त्यांना सूचना देऊन सतर्क करण्यात आले. आजूबाजूची घरे रिकामी करण्यात आली आहेत.