चंद्रपूर: पोलीस दलात नेहमी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना सेवानिवृत्तीचा निरोप दिला जातो. परंतु चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने श्वानपथकातील निवृत्त झालेल्या शोधांना निरोप समारंभ आयोजित करत श्वान ग्रेसी आणि सिंबा या मुक्या शिलेदारांना मानाची सलामी दिली.

सोमवार २५ डिसेंबर रोजी चंद्रपूर शहर पोलीस दलातील बॉम्बशोधक पदकाचे श्वान ग्रेसी आणि सिंबा हे आपली सेवा कार्यकाल निभावून यशस्वीपणे पूर्ण करून सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला होता. यासाठी  त्यांचे सर्व  मित्र म्हणजेच पोलीस दलातील श्वान पथकाचे(डॉग Squad) सदस्य श्वान पवन, हरी ,अर्जुन, मंगल ,बोल्ट ,मेरी ,व्हिक्टर , मेस्सी आणि नुकतेच चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या शानपथकात दाखल झालेले रियो आणि कोको हे हजर होते.

हेही वाचा >>>खासदार रामदास तडस म्हणतात,’ बचत गट भवन हे’ या ‘ आमदाराचं देणं…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 त्यांचे हँडलर देखील विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, गृह पोलीस उपाधीक्षक गृह श्रीमती राधिका फडके राखीव पोलीस निरीक्षक नवघरे, श्वान पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पाटील हे उपस्थित होते.यावेळी निवृत्त होणाऱ्या ग्रेसी आणि सिंबा या सत्कारमूर्तींचा शाल आणि पुष्पहार घालून त्याचप्रमाणे मानाची झूल घालून सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. त्याच वेळी सर्व श्वान दोस्ताना  मेजवानी देखील देण्यात आली. या समारंभात उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार भाऊक झालेले होते. अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा निरोप समारंभ आयोजित केला होता. श्वान ग्रेसी आणि सिंबा यांनी पोलिस विभागाला प्रदीर्घ सेवा दिली. पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी श्वान ग्रेसी आणि सिंबा यांच्या आजवरच्या कार्याचे कौतुक केले.