scorecardresearch

चंद्रपूर : जखमी वाघाचा चिमुरच्या जंगलात संचार

चिमूर लगत खडसंगी व झरी परिसरात हा जखमी वाघ फिरत असल्याचे समजते.

चंद्रपूर : जखमी वाघाचा चिमुरच्या जंगलात संचार

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिमूर वनपरिक्षेत्रात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एक वाघ जखमी अवस्थेत दिसून आला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा पट्टेदार जखमी वाघ जंगलात फिरत असून त्याच्या डोळा व कानाजवळ जखम असल्याचे ट्रॅप कॅमेरात आढळून आले आहे. चिमूर लगत खडसंगी व झरी परिसरात हा जखमी वाघ फिरत असल्याचे समजते.

वनविभागाच्या मते दुसऱ्या वाघासोबत झालेल्या झुंजीत हा वाघ जखमी झाला असण्याची शक्यता आहे. त्याच्या पायाला देखील जखम असल्याची माहिती आहे. वनविभागाने जखमी वाघाचा उपचार लवकरात लवकर करावा अशी मागणी होत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या