चंद्रपूर : लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. भाजपने प्रचारात आघाडी घेतली असून होळी व धूलीवंदनाच्या बाजारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुखवट्याची जोरदार विक्री सुरू आहे.

लहान मुलांच्या पिचकारी पासून तर मुखवटे, वेगवेगळ्या रंगांच्या डब्ब्यांवर केवळ मोदी यांचेच छायाचित्र आहे. होळीचा संपूर्ण बाजार मोदींनी व्यापला असून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात होण्यापूर्वीच मुखवट्यातून प्रचार सुरू झाल्याने हा आचार संहितेचा भंग नाही का? तसेच हा खर्च निवडणूक आयोग कोणाच्या खात्यात जमा करणार असा प्रस्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा…नागपुरात लोकसभेसाठी अर्जविक्री जोरात, काय आहे राजकीय गणितं?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या सत्रात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी २० एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र जमा करायला सुरुवात झाली आहे. एकदा नामनिर्देशन दाखल झाल्यानंतर ३० मार्च रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर चिन्ह वाटप व अधिकृत प्रचाराला सुरुवात होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, त्यापूर्वीच रविवार २४ मार्च रोजी होळी व २५ मार्च रोजी धुलीवंदन आहे. होळी व धुलिवंदनसाठी शहरातील गोल बाजार व मुख्य रस्त्यावर दुकाने थाटण्यात आली आहे. होळीच्या या बाजारात सर्वत्र प्रधानमंत्री मोदी यांचीच प्रतिमा दिसत आहे. होळीच्या मुखवट्यावर मोदी यांचे छायाचित्र आहे तर पिचकारी, रंगांचे रंगबिरंगी डबे तथा इतर सर्व साहित्यावर मोदी यांचे चित्र , फोटो बघायला मिळत आहे. होळीचा संपूर्ण बाजार मोदी यांनी व्यापलेले आहे. प्रचार सुरू होण्यापूर्वीच प्रचार हा आचार संहितेचा भंग नाही का ? असे विरोधक विचारत आहे.

हेही वाचा…घड्याळ चिन्हाबाबत न्यायालयाच्या अटींचा नागपूर राष्ट्रवादीला विसर

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस पूर्वी १७ मार्च रोजी रामनवमी आहे. रामनवमी मिरवणूक तथा कार्यक्रमावर पूर्णपणे प्रधानमंत्री मोदी व भाजपच्या प्रचाराची व्यूहरचना भाजपच्या वतीने आखण्यात आलेली आहे. त्यामुळं विरोधी पक्षाची चांगलीच अडचण झाली आहे.