राज्यपाल बदलण्याचे अधिकार ना मला आहे ना आदित्य ठाकरेंना आहे. तो केंद्रीय व्यवस्थेचा विषय आहे मात्र, आदित्य ठाकरेची राजकारणात सुरूवात असताना ते मोठे राष्ट्रीय नेते झाल्यासारखे वागत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि शिंदे गटाचे आमदाराने ही दगडफेक केली असेल तर पोलीस त्याची चौकशी करतील. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशा गोष्टीचे कधी समर्थन करणार नाही. कोणाच्या ही ताफ्यावर दगडफेक करणे योग्य नाही. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील असेही बावनकुळे म्हणाले.शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना दोन चष्मे आहेत.

हेही वाचा >>>नागपूर: सात वर्षे पूर्ण झाली तरी मोदींच्या स्वप्नातील स्मार्ट सिटी आकार घेईना; पुणे, सोलापूर वगळता नागपूरसह इतर शहरे माघारली

एका चष्म्यातून पाहिले तर त्यांना सर्व हिरवा रान दिसते आणि दुसऱ्या चष्म्यातून त्यांना हिरवा असलेला रानही कोरडा दुष्काळ दिसतो. एका चष्म्यातून ते उद्धव ठाकरे, शरद पवार, महाविकास आघाडी यांच्या उपक्रमांना पाहतात. तर दुसऱ्या संदर्भात त्यांना कोरडा दुष्काळ दिसतो. एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहे.. त्यांची सभा मोठी झाली. त्यांना खुर्च्या उचलाव्या लागल्या नाही तर चांगले समर्थन मिळाले आहे. भाजपमध्ये वेगवेगळे अभियान राबवत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही काही संन्यासी नाहीत. आम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहोत. आम्ही पक्ष वाढवण्याचे काम करतो आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची मातीची झाली आहेत. तिथे कोणी राहायला तयार नाही. म्हणून लोक आमच्याकडे राहायला येतात. आम्ही त्यांना थांबवत नाही. आम्ही मात्र कोणाच्या घरात जात नाहीये.

हेही वाचा >>>वर्धा : लाजराबुजरा साळींदर रस्त्यावर उतरला, अन्…

आम्ही कोणालाही ऑफर देणार नाही.. आमच्या पक्षात या, असा निमंत्रण देणार नाही.. मात्र भाजपमध्ये कोणीही आला तर त्यांचा स्वागत करू असेही बावनकुळे म्हणाले. २०२४ मध्ये एवढे पक्षप्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट होणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना उमेदवार मिळणार नाही असेही बावनकुळे म्हणाले. चौकटबाळासाहेब थोरात यांच्या नाराजी वर मी त्यांची भेट घेणे योग्य नाही. तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. बाळासाहेबांची नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे हेही मला माहित नाही. आयुष्याची चाळीस वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षासाठी मेहनत घेतली आहे. सहकार क्षेत्रात मोठे काम केले आहेत आणि अशा नेत्याला पक्षातंर्गत त्रास होऊन राजीनामा द्यावा लागतो. हे काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे मात्र भाजपमध्ये अशी नाराजी राहिली तर आम्ही लगेच वरिष्ठ नेत्यांची दखल घेतो असेही बावनकुळे म्हणाले.