लोकसत्ता टीम

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे नापास झाले. शरद पवार यांनी तेव्हा त्या सरकारला सांगायला पाहिजे होते की, जेष्ठ वकील लावा पण त्यांनी ते केले नाही. त्यामुळेच मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी जबाबदार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करून दुसऱ्या समाजाला आरक्षण देणे हे योग्य नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यावेच पण, त्यावेळेस सामाजिक आर्थिक, सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने केले होते त्या सर्वेक्षणाप्रमाणे पुढे कसे जाता येईल आणि मराठा समाजाला न्याय कसा देता येईल याबाबत सरकार सकारात्मक विचार गरजेचा आहे. वडेट्टीवार यांची भूमिका योग्य नाही. राजकारणापोटी त्यांचा स्तर खाली गेला आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

आणखी वाचा-जालना लाठीमार घटनेच्या निषेधार्थ उमरखेड बंद; उद्या यवतमाळमध्ये चक्काजाम

ओबीसीं मधून आरक्षण द्या ही विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी योग्य नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. वेगळी टक्केवारी केली पाहिजे. त्याकरता नियमाप्रमाणे सर्व केले पाहिजे मात्र, ओबीसी आरक्षण काढून मराठा समाजाला द्या ही मागणी योग्य नाही. यामुळे दोन्ही समाजात वाद निर्माण होतील. भाजपचा मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिल देशमुख यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी २४ तासात द्यावा. तोंडाच्या वाफा दवडू नये. देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला फोन केला हे त्यांनी सांगावे. खोटारडेपणा करू नये, अशी टीका त्यांनी केली.