बुलढाणा : चीनने मोठ्या प्रमाणावर निवडणूक रोखे अर्थात ‘इलेक्ट्रोल बॉण्ड’ खरेदी केले, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने खळबळ उडाली. बुलढाणा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार वसंत मगर यांच्या प्रचारार्थ व रावेर मतदारसंघात वातावरण निर्मितीच्या दृष्टीने नांदुरा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. रावेर मतदारसंघातील नांदुरा नजीकच्या ‘एसपीएम कॉलेज’परिसरात बुधवारी ही सभा झाली. या सभेत त्यांनी थेट ‘पीएमओ’ वरही हल्ला चढविला. प्रधानमंत्री कार्यालय हे मानवतेचे कार्यालय होण्याऐवजी ईडी, सीबीआय व जीएसटीच्या माध्यमांतून वसुली करणारे कार्यालय बनले आहे.

अरुणाचल प्रदेश व लडाखमध्ये चीन आपल्या छातीवर येऊन बसला आहे. सैन्यदल हल्ला करायला तयार असताना पंतप्रधान त्यावर कुठलाही निर्णय न घेता मौन बाळगून आहेत. याचे कारण चीनने मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रोल बॉण्ड खरेदी करून लाभ करून दिला आहे. केंद्र सरकार हे वसुली करणारे असून तुम्ही यांना मतदान करणार की जातीला मतदान करणार आहात, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.

हेही वाचा…VIDEO: अस्वलाने पिल्लाला बसवले पाठीवर आणि घडवली जंगलाची सैर…हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा बघाच….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिल्यास एनआरसी व सीएए दोन्ही कायदे हद्दपार करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. देशात हिंदू धोक्यात आल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. प्रत्यक्षात राज्यसभेच्या नोंदीनुसार, सन २०१४ ते २०२४ पर्यंत १७ लाख हिंदू कुटुंबांनी देश सोडला असून नागरिकत्वही सोडले आहे. जे २०१४ नंतर सोडून गेले ते सरकारच्या त्रासामुळे गेल्याचा दावा आंबेडकरांनी केला.