नागपूर : सरकार मराठा आरक्षण देण्याच्या भूमिकेत असताना जालनामध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण विरोधी पक्षाला टिकवता आले नाही. मात्र या संवेदनशील मुद्द्यावर महाविकास आघाडीतील नेते राजकारण करून स्वतःची पोळी भाजण्याचा काम करत आहे आणि हे अतिशय दुर्दैवी आहे असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली.

चित्रा वाघ नागपुरात आल्या असता त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. ज्यांना आरक्षण टिकवता आले नाही. त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही. मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला होता. विरोधकांना मराठा समाजाच्या आरक्षणावर आता बोलण्याचा अधिकार नाही. लोकांना भडकावण्याचे काम केले आहे. जेव्हा महाविकास आघाडीच्या हातात होते त्यावेळी त्यांनी मिळालेल्या आरक्षण घालवायचा काम केले त्यामुळे विरोधकांना हा अधिकार नाही की त्यांनी मराठा आरक्षणावर बोलावे. जालनाच्या घटनेत काही पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले.

हेही वाचा >>>आरोग्य विभागातील पदभरतीसाठी दहा लाखांवर अर्ज येण्याचा अंदाज, सर्व्हरबाबत काय दिल्या सूचना?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलनाच्या मागे कोण याचा चौकशी सुरू असून लवकरच ते समोर येईल असे वाघ म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी लढाई लढली. पण, महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण टिकवता आले नाही. शिंदे सरकारची सकारात्मक भूमिका आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्य सरकार सकारात्मक आहे, शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचे महायुतीचे सरकार हे पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायला यशस्वी ठरेल. मुख्यमंत्र्यांनी आंदोलन कर्त्याशी संवाद साधला होता मात्र या घटनेवर विरोधी पक्षानी राजकारण करू नये असेही वाघ म्हणाल्या.