वर्धा: समुद्रपूर परिसरात ताडगाव शिवारात १५ दिवस दहशत पसरवून एक वाघ शेवटी चिमूरकडे रवाना झाला. त्यास आता आठवडा लोटत नाही तोच पुन्हा एका वाघाच्या डरकाळ्या परिसरास सुन्न करणाऱ्या ठरत आहे.

हिंगणी, सेलू परिसरात ज्या वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या, तो वाघ ताडगाव परिसरात आढळून आलेला नाही. हा दुसराच वाघ असल्याचे उपविभागीय वनाधिकारी पवार यांनी सांगितले.

हेही वाचा… दोन्ही खिशात पैसे तर एकाच खिशातील कसे लुटले? पोलिसांचा तर्क अन् बनाव उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेलू तालुक्यातील हिंगणी येथून त्याची शनिवार पासून भ्रमंती सुरू झाली. आता तो अल्लीपुर पुढे शिवणगाव परिसरात असल्याची माहिती आहे. मजल दरमजल करीत त्याने दोन दिवसात हिंगणघाट तालुक्यातील वनक्षेत्रात प्रवेश केला. आज वन तसेच पोलीस अधिकारी या परिसरात पोहचत असल्याची माहिती देण्यात आली. याच परिसरात असलेल्या सिंचन प्रकल्पाच्या विश्रामगृहालगत वाघाच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत.