नागपूर : झारखंडमधील रांची शहरात राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीची इंस्टाग्रामवरून नागपुरातील एका युवकाशी ओळख झाली. शाळेतून घरी जाण्याऐवजी मुलीने थेट रेल्वेने नागपूर गाठले. रेल्वेस्थानकावर प्रियकराची भेट होताच दोघांनी पळ काढला. दुसरीकडे मुलगी घरी न आल्याने रांची पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांनी नागपूर गुन्हे शाखेच्या एएचटीयू पथकाला मदत मागितली.

हेही वाचा >>> नागपूर: क्षणिक सुखासाठी विस्कटला सुखी संसार, फेसबुकवरील मित्राशी लग्न, इंस्टाग्रामवरील मित्राशी पुन्हा प्रेम…!

नागपूर पोलिसांनी प्रेमीयुगुलाला घेतले. रांची जिल्ह्यातील अरगोरा येथील पलक (बदललेले नाव) ही १५ वर्षांची मुलगी दहावीत शिकते. तिचे नागपुरातील राजूशी इंस्टाग्रामवरून ओळख झाली. ती नेहमी कुटुंबीयांची तक्रार करीत होती. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. तिने पळून जाऊन लग्न करण्याचा हट्ट केला. त्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न करण्याचे सूचवले. मात्र, प्रेमात वेडी झालेली पलक भेटण्यासाठी आतूर झाली होती. शुक्रवारी ती नागपुरात आली.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंचे नागपूर विमानतळावर दणक्यात स्वागत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरगोरा पोलिसांनी पलकच्या भ्रमणध्वनीचे ‘लोकेशन’ तपासले असता ती नागपुरला असल्याचे समजले. त्यांनी नागपुरात गुन्हे शाखेला फोनवरून माहिती दिली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्या पथकाने पलकचा शोध घेतला असता ती गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तिच्या इन्स्टाग्रामवरील मित्राच्या घरी आढळली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ, उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबुसकर, मनिष पराये, दिपक बिंदाने, शरीफ शेख, ऋषीकेश डुमरे, आरती चौहान, अश्विनी खोडपेवार यांनी केली.