नागपूर: महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महायुती सरकारमधील विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक- मेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी नागपुरात आले होते. येथे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे जिथे जात आहे. तिथे लोक पाठ फिरवत आहे. फडणवीस पुढे काय म्हणाले, त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपुरातील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था (एम्स) येथे एका कार्यक्रमासाठी आले असता देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत, मला आनंद आहे की ते घराबाहेर पडले आहेत. मात्र, ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांवर संकट आले होते, तेव्हा त्यांनी कारपेट खाली उतरून लोकांमध्ये जाण्याचे टाळले होते. आता सततच्या राजकीय पराभवांमुळे त्यांना लोकांमध्ये जाण्याची गरज जाणवू लागली आहे. पण आपणच पाहत आहात की, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे जात आहेत, तिथे लोक पाठ फिरवत आहेत.
त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांचा दौरा सुरू आहे. शेतकऱ्यांना सरकारचे मदतपॅकेज मिळत आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. काही ठिकाणी तर लोकांना पकडून त्यांच्या सभांमध्ये आणावे लागत आहे. राज्यात काही ठिकाणी पॅकेजचे पैसे सध्या पोहोचले नसतील, पण दररोज सुमारे ६०० कोटी रुपये आरबीआयच्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. त्यामुळे हे संपूर्ण पॅकेज प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत दररोज पोहोचत असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रवी भवन येथील बंगल्यावर १ कोटींच्या खर्चाबाबत म्हणाले…
नागपुरातील रवी भवन येथील बंगल्यांवरील १ कोटी रुपयांच्या च्या खर्चाबाबतही फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांशी मी या प्रकरणाबाबत चर्चा करेन. ही माहिती उपलब्ध होताच शासन लवकरच प्रसिद्धी माध्यमांना ही माहिती उपलब्ध करेल.
पुण्यातील जमीन प्रकरणावर…
पुण्यातील कथित जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी झालेल्या आरोपांच्या संदर्भात, मी महसूल विभाग आणि भूमिअभिलेख विभाग या दोन्हींकडून संपूर्ण माहिती मागवली आहे. या चौकशीच्या आणि मिळालेल्या माहितीच्या आधारेच आम्ही अधिकृत भूमिका मांडू. प्रथमदर्शनी समोर आलेले काही मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे सर्व माहिती मिळाल्यानंतरच मी या विषयावर सविस्तर भाष्य करेल, असे फडणवीस म्हणाले
