नागपूर: पावसाळा सुरू झाला की, सरपटणाऱ्या प्राण्याचे दर्शन कुठेही घडते. विशेषत: साप त्याच्या बिळात पाणी शिरल्याने आसरा शोधत असतो. अशा वेळी जेथे जागा मिळेत तेथे तो जातो. शहरात सध्या सर्वत्र सिमेंटीकरण झाले आहे. रस्त्या लगतही फेव्हर ब्लॉक लावले आहे. त्यामुळे जमीन दिसतच नाही. अशा वेळी सरपटणारे प्राणी रस्त्यालगत असलेल्या घरांचा असरा घेतात. दडून बसण्यासाठी आडोसा शोधत असतात. अशाच प्रकारे अतिविषारी समजल्या जाणाऱ्या कोबरा सापाने नागपुरात एका घरात आसरा शोधला. तो चक्क पलंगावर चढला आणि उशीखाली दडून बसला.
शहरातील महाजनवाडी परिसरातील जयस्वालनगर मधील रहिवासी पंकज चवरे यांच्या घरात हा धक्कादाक प्रकार घडला. नेहमी प्रमाणे पकंज चवरे हे सांयकाळनतर घरी अंतरुण व्यवस्थित करण्यासाठी गेले. चादर झटकली असता त्यांना पलंगावर भलामोठा नाग दिसला. ते पाहून पंकज घाबरले व घराबाहेरपडले. त्यांनी हा प्रसंग कुटुंबियांना सांगितला. घरातील पलंगावर उशीखाली साप दडला आहे. हे ऐकूण परिसरातील नागरिकांना आणि कुटुबातील सदस्यांनाही धक्का बसला. चादर न झटकता पलंगावर झोपले असते तर सर्पदंश झाला असता या कल्पनेनेच सर्वांची बोबडी वळली. त्यानंतर पुढे काय करायचे म्हणून सर्पमित्रांशी संपर्क साधण्यात आला. थोड्या वेळाने सर्पमित्र आले व त्यांनी पंकज यांच्या घरी पलंगावर असलेल्या सापाला पकडले व बाहेर सोडले. मात्र असे असले तरी चवरे कुटुंबीय अजूनही या धक्क्यातून बाहेर पडले नाही. साप घरात कुठून आला असेल या कल्पनेनेच गर्भगळीत होतात.
दरम्यान पावसाळ्यात रस्त्याशेजारी, नाल्या शेजारी असलेल्या घरात साप सामान्यपणे आढळून येतात. ते भींतीवरून घरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सावध असावे. झोपताना अंथरूण नीट झकून घ्यावे, घराबाहेर ठेवण्यात येणारे चप्पल, बुट घालताना नीट झटकून घ्यावे, अशा सूचना सर्प मित्रांनी केल्या आहेत.