महेश बोकडे

नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावर तपासणीसाठी परिवहन खात्याला भाडय़ाची वाहने उपलब्ध करून दिली आहेत. परंतु, या सोबतच दैनिक लॉग बुक नोंदीसह इतरही अजब अटी घातल्याने परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.‘एमएसआरडीसी’च्या अखत्यारित असलेल्या समृद्धी महामार्गावर वाढते अपघात हा चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे परिवहन खात्याने ‘एमएसआरडीसी’कडून महामार्गार तपासणीसाठी ६ महिन्यांकरिता भाडेतत्त्वावर ८ वाहने घेतली.

या वाहनांचा नुकताच करार संपुष्टात आला. त्यामुळे परिवहन खात्याने पुन्हा एमएसआरडीसीला वाहने उपलब्ध करण्याची विनंती केली. त्यामुळे ‘एमएसआरडीसी’कडून  वाहनांना तीन महिने मुदतवाढ देण्यात आली. परंतु ही वाहने देताना अजब अटी घातल्या. त्यानुसार या सर्व वाहनांचे लॉग बुक आरटीओ अधिकाऱ्यांना रोज अद्ययावत करायचे आहे, या वाहनांचे देयक  समृद्धी महामार्गाचे प्रकल्प संचालक यांच्या शिफारशीनेच सादर करायचे आहे.  परंतु, ही कारकुनी अधिकाऱ्यांना मान्य नसल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे.

हेही वाचा >>>मल्लिकार्जुन खरगे स्पष्टच म्हणाले, ‘काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना’

अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विषयावर परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आणि  हा विषय हाताळणारे भरत कळसकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. ‘एमएसआरडीसी’च्या मुंबईतील  कार्यालयात  संपर्क केला असता बांद्रे कार्यालयाशी संपर्काचा सल्ला दिला गेला.  बांद्रे कार्यालयात संपर्क होऊ शकला नाही.