नागपूर : हिंगण्यातील तरुणाचे जर्मनीत नोकरीवर असताना तेथील तरुणीशी प्रेमसंबंध झाले. दोघांनी दोन्ही देशाची बंधने झुगारून प्रेमविवाह केला. जर्मनी ते थेट नागपूर गाठून सुखाने सुंसार सुरू झाला. मात्र, मराठी भाषा बोलणारी सासू आणि जर्मनी भाषा बोलणाऱ्या सुनेमधील संवादामुळे मुलाच्या संसारात ठिणगी पडली. सासू पतीला मराठीतून काहीतरी सांगते आणि पती माझ्याशी भांडण करतो, असा गैरसमज सुनेला झाला. त्यातून वाद विकोपास जाऊन संसार तुटण्याच्या काठावर आला. या प्रकरणात भरोसा सेलने जर्मन भाषा तज्ञ आणि गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून नात्यातील गुंतागुंत सोडवून दोघांचाही संसार पुन्हा रुळावर आणला. निशांत उच्चशिक्षित असून तो नोकरीसाठी जर्मनीत गेला. तेथे फार्मासिस्ट असलेली तरुणी अर्थिंगा (बदललेले नाव) हिच्याशी त्याची ओळख झाली. निशांतलाही जर्मन भाषा येत असल्याने दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. अर्थिंगा हिनेही लग्नानंतर भारतात राहण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे दोघांनीही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. तिने जर्मनीत कमावेला पैसा सोबत घेतला आणि दोघेही गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतात आले. निशांतने आईच्या विरोधानंतरही भारतातही नोंदणी पद्धतीने लग्न करून संसार सुरु केला. आणखी वाचा-“हा न्यायालयाचा अवमानच!” व्हीएनआयटी व प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे नागरिक संतप्त दोघांचाही संसार सुरळीत सुरु असताना निशांतची आई मुलाकडे राहायला आली. मराठी भाषा बोलणारी सासू आणि जर्मनसह थोडीफार इंग्रजी भाषा बोलणारी सून यांच्यात भाषा आडवी आली. त्यामुळे दोघींमध्ये संवाद होत नव्हता. दोघीही इशाऱ्यांमध्ये बोलून एकमेकींशी पटवून घेत होत्या. मात्र, काही दिवसांपू्र्वी सासूने मुलाला मराठीतून डॉक्टरकडे नेण्यासाठी म्हटले. काही वेळानंतर निशांतचा आणि अर्थिंगाचा वाद झाला. त्यामुळे अर्थिंगाला वाटले की माझ्या सासूने मराठीतून पतीला माझ्याविरोधात भडकवले असा गैरसमज झाला. पतीसोबत वाद झाल्यानंतर अर्थिंगा सासूलाच जबाबदार धरायला लागली. त्यामुळे घरातील वातावरण बिघडले. संसार तुटण्याच्या मार्गावर निशांत आणि अर्थिंगा जर्मनी भाषेतून भांडत असल्यामुळे आईला काहीच कळत नव्हते. परंतु, भांडणासाठी नेहमी पतीच्या आईलाच सून जबाबदार धरत होती. त्यामुळे पती-पत्नीतील वाद विकोपास गेला. संसारही तुटण्याच्या मार्गावर आला. अर्थिंगाने जर्मनीतून आणलेली रक्कम परत मागितली आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याची मानसिक तयारी केली. आणखी वाचा-वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाची परंपरा खंडित; कारण काय? जाणून घ्या… भरोसा सेलची महत्वाची भूमिका निशांत आणि अर्थिंगाचे प्रकरण भरोसा सेलमध्ये पोहचले. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे आणि समूपदेशिका अनिता गजभीये यांनी निशांतकडून प्रकरण समजून घेतले. मात्र, अर्थिंगाला जर्मन भाषा येत असल्यामुळे अचडण निर्माण झाली. निशांत हा पत्नीचे म्हणने जर्मनीतून भाषांतर करीत पोलिसांना सांगत होता. तसेच पोलिसांनीही जर्मन भाषा तज्ञ आणि ‘गुगल ट्रान्सलेटर’चा वापर केला. दोघांचीही समजूत घातली. अर्थिंगाच्या मनातून गैरसमज निघाला आणि दोघांचाही संसार पुन्हा रुळावर आला.