scorecardresearch

Premium

गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या सदावर्तेला बेड्या ठोका….काँग्रेसचा संताप

या विकृत इसमाला तात्काळ बेड्या ठोकण्याचे धाडस गृहमंत्री फडणवीस यांनी दाखवावे, असे आव्हान प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले.

congress spokeperson atul londhe, congress demands arrest of gunaratna sadavarte
गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या सदावर्तेला बेड्या ठोका….काँग्रेसचा संताप (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेचा उदो उदो करण्याची प्रवृत्ती देशात बळावत चालली आहे. गोडसे हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी आहे हे जगजाहीर असताना त्याचे गुणगान गाण्याची हिंमत फक्त भारतीय जनता पक्षाचे सरकार असतानाच होते. सदावर्ते नावाच्या एका विकृत इसमाने स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर गोडसेचा फोटो छापून उदात्तीकरण केले आहे. या विकृत इसमाला तात्काळ बेड्या ठोकण्याचे धाडस गृहमंत्री फडणवीस यांनी दाखवावे, असे आव्हान प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले.

हेही वाचा : यवतमाळच्या झरीजामणीत विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या

sadhvi pragya thakur, hindus and hindu dharma, speaking against hindu dharma
हिंदू विरुद्ध बोलाल तर समूळ उच्चाटन करू, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे प्रतिपादन
Chandrasekhar Bawankule in Ichalkaranji
समाज घटकांनी भाजपशी सामावून घ्यावे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे इचलकरंजीत आवाहन
congress leader vijay wadettiwar on obc, vijay wadettiwar on cm eknath shinde, cm eknath shinde obc meeting, duplicate obc meeting,
विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक डुप्लिकेट ओबीसींची…
nana patole
सामान्यांना मंत्रालयात प्रवेशबंदी – पटोले

सदावर्ते हा व्यवसायाने वकील असलेला इसम सातत्याने भडाकाऊ विधाने करत असतो, सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम करतो. महात्मा गांधी यांच्याबद्दलही हा इसम गरळ ओकत असतो. आज याने गोडसेचा फोटो स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर छापून महात्मा गांधी यांचा अपमान केला. “गांधी यांचा विचार आता शिल्लक राहिलेला नाही” असे म्हणत सदावर्ते याने नथुरामचे गुणगान गायले. सदावर्ते या इसमाच्या मागे कोणाची शक्ती आहे, त्याचा बोलविता धनी कोण आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. राष्ट्रपित्याचा अपमान काँग्रेस पक्ष सहन करणार नाही, असेही लोंढे म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress agressive on nathuram godse photo published on the annual report of state transport cooperative bank demands arrest of adv gunaratna sadavarte rbt 74 css

First published on: 29-09-2023 at 18:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×