नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत तापमान चांगलेच वाढले आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे सगळ्याच शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या दिवसाला साडेसात हजारांवर पोहचली आहे. हे ही संख्या १८ एप्रिलला १ हजार ८३६ रुग्ण होती, हे विशेष.
सर्वाधिक रुग्ण नोंदवलेल्या जिल्ह्यात वर्धा आणि नागपूरचा समावेश आहे. यात नागपुरातील मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांचा समावेश नाही. परंतु या रुग्णालयातही दिवसाला सुमारे चार हजारांवर रुग्णांची नोंद होत आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासकीय रुग्णालयांत ३ मार्चच्या दुपारपर्यंत २४ तासांमध्ये बाह्यरुग्ण विभागात ७ हजार ७३५ रुग्ण उपचाराला आले.
हेही वाचा…रॅगिंग सुरूच! महाविद्यालय व विद्यापीठांवर कठोर कारवाई करण्याचा यूजीसीचा इशारा
सर्वाधिक ६ हजार ३७८ बाह्यरुग्ण हे केवळ वर्धा जिल्ह्यातील होते. नागपूर ग्रामीण ६८७ रुग्ण, चंद्रपूर महापालिका हद्दीत ३५६ रुग्ण, चंद्रपूर ग्रामीण ९५ रुग्ण, भंडारा ६७ रुग्ण, गडचिरोलीत १५२ रुग्ण नोंदवले गेले. या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये खासगी रुग्णालयांमध्येही दुप्पट रुग्ण येत असल्याचा दावा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे. परंतु त्याची नोंद होत नाही. हे रुग्ण उष्मघाताचे नसून इतर आजाराचे असल्याचा आरोग्य विभागाच्या दावा आहे.
नागपुरात तीन संशयितांचा मृत्यू
नागपूर महापालिका क्षेत्रात अद्याप एकही उष्माघाताच्या रुग्णाची अधिकृत नोंद नाही. परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाने तीन संशयितांचा मृत्यू नोंदवला आहे. या मृत्यूचे अंकेक्षण शवविच्छेदन अहवालानंतर केले आहे.
हेही वाचा…अंबाझरीतील धोका कायमच! परिसरातील वस्त्यांच्या सुरक्षेबाबत नुसतीच चालढकल
नागपूर महापालिका, गोंदियातील नोंद वादात
शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नोंदी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर सादर कराव्या लागतात. परंतु, ३ मार्चच्या नोंदीत नागपूर महापालिका आणि गोंदिया येथील शासकीय रुग्णालयांमध्ये एकही बाह्यरुग्णाची नोंद नाही. त्यामुळे येथील नोंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पूर्व विदर्भातील २४ तासातील रुग्णसंख्या (३ मे)
जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण
वर्धा ६३७८
भंडारा ०६७
चंद्रपूर (ग्रा.) ०९५
चंद्रपूर (श.) ३५६
हेही वाचा…पोलीस भरतीसाठी अभियंते, डॉक्टरांसह उच्चशिक्षितांचेही अर्ज
गडचिरोली १५२
गोंदिया ०००
नागपूर (ग्रा.) ६८७
नागपूर (श.) ०००
एकूण ७,७३५