यवतमाळ : विवाहित प्रेमियुगुलाने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना झरी जामणी तालुक्यातील कोडपाखिंडीच्या जंगलात आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मंदा अर्जुन गाऊत्रे (३०) आणि नामदेव गोविंदा खडसे (३३) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. कोडपाखिंडी गावातील नामदेव खडसे यास एक मुलगी व एक मुलगा आहे. तर मंदा अर्जुन गाऊत्रे हिला दोन मुली आहेत. मागील काही वर्षांपूर्वी नामदेव व मंदा यांचे प्रेमसंबंध जुळले. सहा महिन्यांपूर्वी दोघेही गावातून पळून गेल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा : “हे पाळलेल्या कुत्र्याचे दुकान नाही”, ॲड. गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेच्या तीन दिवसांपूर्वी दोघेही गावात परत आले होते. परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरात घेण्यास नकार दिल्याने, गुरुवारी सायंकाळी दोघेही कोडपाखिंडी गावातून काही अंतरावर असलेल्या जंगलात गेले. तिथे मुरूमच्या खाणीत असलेल्या झाडाला नायलॉन दोरी बांधून त्यांनी एकाच दोराला दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पाटण पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.