आगामी निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून काँग्रेसने शहरात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाला नागपुरात सुरुवात केली. मुख्य कार्यक्रम देवडिया काँग्रेस भवन येथील शहर काँग्रेसच्या कार्यालयात झाला तर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातही अभियानाचा प्रारंभ पक्षाचा ध्वज फडकावून करण्यात आला.

हेही वाचा- परदेशी शिष्यवृत्तीधारक लाभापासून वंचित; शासनाच्या चुकीच्या धोरणाचा विद्यार्थ्यांना फटका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा यशस्वी झाल्यानंतर काँग्रेसने मतदारापर्यंत पोहचण्यासाठी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान हाती घेतले आहे. हे अभियान दोन महिने चालणार आहे. काँग्रेस नेते ब्लॉक आणि बुथ पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहेत. शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी भोलासिंग टाॅवर देवडिया भवन येथे सोमवारी काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकावून अभियानाला सुरुवात केली. यावेळी प्रदेश सरचिटणीस उकामांत अग्निहोत्री, सरचिटणीस अतुल कोटेचा, माजी नगरसवेक प्रशांत धवड, प्रा.दिनेश बानाबाकोडे, सेवादलाचे अध्यक्ष प्रवीण आगरे, सेवादल प्रमुख रामगोविंद खोब्रागडे, महिला अध्यक्षा नॅश अली, सरफराज खान, महेश श्रीवास, डाॅ. मनोहर तांबुलकर उपस्थित होते.

हेही वाचा- …तर आम्ही तुमचा ‘दाभोळकर’ करू, ‘अंनिस’चे श्याम मानव यांना धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्व नागपूर काँग्रेस पक्षाचे ध्वजवंदन ब्लाॅक अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे निरीक्षक यांच्या उपस्थितीत सुभाष पुतळा येथे ध्वजवंदन करण्यात आहे. ब्लाॅक अध्यक्ष युवराज वैद्य, निरीक्षक योगेश कुंजलकर यांनी मिनिमाता नगर, विजय नगर येथे काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकावून ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाला सुरुवात केली. राजेश पौनीकर, निरीक्षक यांनी कुंभारटोली चौक येथून, दक्षिण नागपूर ब्लाॅक अध्यक्ष विश्वेश्वर अहिरकर, निरीक्षक किशोर गीद यांनी छोटा ताजबाग येथून, ब्लाॅक अध्यक्ष दिनेश तराळे, निरीक्षक वीणा बेलगे यांनी बालाजी नगर चौक, प्रवीण गवरे, निरीक्षक सुनील पाटील यांनी म्हाळगीनगर चौक, दक्षिण-पश्चिम नागपूर ब्लाॅक अध्यक्ष पंकज थोरात, निरीक्षक विनोद नागदेवते यांनी बालाजी अपार्टमेंट, कालोटे काॅलेजजवळून, रजत देशमुख निरीक्षक मनीष चांदेकर यांनी नरेंद्र नागभीडकर यांच्या घराजवळून, पंकज निघोट, निरीक्षक अजय नासरे यांनी त्रिमूर्ती नगर चौक येथून, पश्चिम नागपूर ब्लाॅक अध्यक्ष राजकुमार कमनानी, निरीक्षक श्याम सोनेकर यांनी झाशी रानी चौक येथून, देवेंद्र रोटेले, निरीक्षक युगल विदावत यांनी गड्डीगोदाम, मोहन नगर येथून, मध्य नागपूर ब्लाॅक अध्यक्ष मोतीराम मोहाडीकर, निरीक्षक बारईपुरा येथून, अब्दुल शकील, निरीक्षक ॲड अभय रणदिवे यांनी महाल, गडकरी यांच्या घरापासून, गोपाल पट्टम, निरीक्षक महेश श्रीवास यांनी सेवासदन चौक येथून तर उत्तर नागपूर ब्लाॅक अध्यक्ष ईरशाद मलिक, निरीक्षक धरम पाटील यांनी टेका नाका येथून काँग्रेस पक्षाचा तिरंगा ध्वज फडकावून ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाला ब्लाॅकनिहाय सुरुवात केली.