काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. कुणबी समाजाने खऱ्या अर्थाने राज्याला नेतृत्व दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे होते, त्यांनी नेतृत्व व राज्य कसे असावे, याची दिशा राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दिली. महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण कार्य करीत आहोत, असे पटोले म्हणाले. अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नानांनी शिवरायांबाबत केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद उसळण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “या प्रकल्पाचा अभिमान आहेच पण…” ‘समृद्धी महामार्गा’बाबत दिग्दर्शक रोहित शेट्टीची सूचक पोस्ट

अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपले नेतृत्व मोठे व्हावे, असे अपेक्षित असते. समाजाचे नेतृत्व राहावे, ही काळाची गरज आहे. कुणबी हा अन्नदाता समाज आहे. देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. आत्महत्या करू नका, ज्या व्यवस्थेकडून आत्महत्या करायला बाध्य केले जात आहे, त्यांना आत्महत्या करायला लावा, असे आवाहन पटोले यांनी केले. कुणबी समाजात माझ्यापेक्षाही अनेक मोठे नेते आहेत. प्रत्येकाला समाजाचे देणे लागते. समाजासाठी सातत्याने कार्य करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते. त्यानुसार मी कार्य करीत असल्याचे पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा- नागपूर : खासदार महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पोलिसांचा लाठीमार; काही युवक जखमी

समृद्धी महामार्गामुळे काही नेते व अधिकाऱ्यांचीच समृद्धी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरही पटोले यांनी टीका केली. मोदींच्या दौऱ्यामुळे कुठलाच फायदा झाला नाही, उलट निराशा झाली. जनतेला वेठीस धरण्यात आले. समृद्धी महामार्गामुळे फक्त काही नेते व अधिकाऱ्यांचीच समृद्धी झाली. लवकरच त्याचे पुरावे बाहेर काढू, असा इशारा पटोले यांनी दिला. भाजपला सत्तेची गुर्मी आल्याची टीकाही त्यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress state president nana patoles controversial statement about shivaji maharaj ppd 88 dpj
First published on: 12-12-2022 at 12:51 IST