२४ तासांत सहा जणांचा मृत्यू, चार हजारांवर रुग्ण  

नागपूर : जिल्ह्यात गुरुवारी ६ मृत्यू नोंदवण्यात आले. त्यामुळे एकीकडे करोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आलेख वाढत असतानाच तिसऱ्या लाटेत प्रथमच तब्बल ४ हजार ४२८ इतके नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात १९ जानेवारीला ५ बाधितांचा मृत्यू झाला होता. त्यात शहरातील ४, जिल्ह्याबाहेरील १ रुग्णाचा समावेश होता. तर गुरुवारी शहरात ३, ग्रामीणला २, जिल्ह्याबाहेरील १ असे नवीन ६ मृत्यू नोंदवले गेले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या ५ हजार ९१०, ग्रामीण २ हजार ६०६, जिल्ह्याबाहेरील १ हजार ६३१ अशी एकूण १० हजार १४७ रुग्णांवर पोहचली आहे. तर तिसऱ्या लाटेत गुरुवारी जिल्ह्यात ४ हजार ४२८ नवीन रुग्णांचा उच्चांक नोंदवला गेला. त्यात शहरातील ३,१८६, ग्रामीण १,१५३, जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्णांचा समावेश होता. रुग्ण वाढले असून शहरात १० हजार १७, ग्रामीणला ३ हजार ८३१ अशा एकूण १३ हजार ८४८ संशयितांच्या चाचण्यांचाही तिसऱ्या लाटेत उच्चांक नोंदवला गेला. चाचण्यांच्या तुलनेत आढळलेले नवीन रुग्ण बघता शहरात सकारात्मक अहवालाचे प्रमाण ३१.८० टक्के, ग्रामीणला ३०.०९ टक्के तर जिल्ह्यात ३१.९७ टक्के नोंदवण्यात आले.

Yavatmal, Policeman, Dies, Heart Attack, running practice,
यवतमाळ : धावण्याच्या सरावादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
Abhishek suffered a heart attack during a visit to Delhi zoo
हृदयविकाराच्या झटक्याने पतीचा मृत्यू, मृतदेह पाहताच पत्नीने सातव्या मजल्यावरुन उडी मारत संपवलं आयुष्य
farmer family performed last rites of ox
चंद्रपूर : पशू नव्हे कुटुंबातील सदस्यच! लाडक्या ‘लखन’च्या मृत्यूनंतर बळीराजाकडून तेरावी; बैलाच्या मृत्यूने शेतकरी कुटुंब…
Nandurbar, food poison, eating Bhandara food, ranala village, 150 people poisoned, marathi news,
नंदुरबार : भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर १५० पेक्षा जास्त जणांना विषबाधा

विदर्भात ७  मृत्यू, तब्बल आठ हजारांवर रुग्ण

विदर्भात २४ तासांत ७ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या लाटेत प्रथमच ८ हजार १८ नवीन रुग्ण आढळले. दगावलेल्या रुग्णांमध्ये नागपूर जिल्ह्यातील ६, अकोल्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. तर दिवसभरात नागपुरात सर्वाधिक ४,४२८, अमरावती ४८०, चंद्रपूर ५६३, गडचिरोली २२४, यवतमाळ ३५८, भंडारा ३२९, गोंदिया २२४, वाशीम १६९, अकोला ४६९, बुलढाणा ३५४, वर्धा जिल्ह्यातील ४२० अशा एकूण विदर्भातील ८ हजार १८ रुग्णांचा समावेश आहे.

करोनामुक्तांचे प्रमाण ९४.४७ टक्क्यांवर   

शहरात दिवसभरात १ हजार ४९७, ग्रामीणला ४३४, जिल्ह्याबाहेरील ५४ असे एकूण १ हजार ९८५ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ६२ हजार ५४६, ग्रामीण १ लाख ५१ हजार २५८, जिल्ह्याबाहेरील ७ हजार ८५० अशी एकूण ४ लाख ९२ हजार ८२८ व्यक्तींवर पोहचली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जिल्ह्यात करोनामुक्त वाढत असले तरी त्यातुलनेत नवीन रुग्ण अधिक आढळत आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या ९४.४७ टक्के अशी खाली आली आहे.

७९.३३ टक्के रुग्ण शहरातील

शहरात सध्या १४ हजार ८१९ (७९.३३ टक्के), ग्रामीणला ३ हजार ६५६ (१९.५७ टक्के), जिल्ह्याबाहेरील २०४ (१.१ टक्के) असे एकूण जिल्ह्यात १८ हजार ६७९ सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालये वा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांची संख्या एक हजारांच्या जवळपास आहे. त्यामुळे  सक्रिय रुग्णांच्या तुलनेत ही संख्या ५.३५ टक्के आहे.  अनेकांना प्राणवायूची गरज नसल्याचे  अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.