चंद्रपूर : केंद्रीय कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने चंद्रपुरातील येहोवा यीरे बचत निधी लि. चंद्रपूर, संपदा अर्बन निधी लि. मूल व लोढिया गोल्ड निधी लि. ब्रह्मपुरी या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील काही कॉर्पोरेट निधी कंपन्यांनी किंवा परस्पर लाभ संस्थांनी कंपनी कायदा २०१३ कलम ४०६ नुसार व त्याखालील नियमानुसार एनडीएच-४ अर्ज कार्पोरेट व्यवहार मंत्रालयात दाखल केले नाहीत.

हेही वाचा >>> ‘महसूल’चे अधिकारी सोमवारी सामूहिक रजेवर, ३ एप्रिल पासून कामबंद आंदोलन

तसेच या अनधिकृत निधी कंपन्यांनी एनडीएच-४ अर्ज दाखल केले आहे परंतु, त्यांचे एनडीएच-४ अर्ज केंद्र शासनाच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून स्वीकारण्यात आलेले नाही, अशा अनधिकृत निधी कंपन्यांमध्ये नागरिकांनी निधी गुंतवू नये तसेच निधी गुंतवण्यापासून सावध राहण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने दिले आहे.

हेही वाचा >>> चंद्रपुरात प्रथमच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे आयोजन; रविवारी ‘पंचक’ या मराठी चित्रपटाने प्रारंभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकारच्या पाहणीत यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील येहोवा यीरे बचत निधी लि. चंद्रपूर, संपदा अर्बन निधी लि. मूल व लोढिया गोल्ड निधी लि. ब्रह्मपुरी या निधी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना कामकाज सुरू ठेवण्यापासून तसेच सदस्यांकडून निधी स्वीकारण्यापासून किंवा सर्वसाधारण जनतेला या कंपन्यांचे सदस्य होण्यापासून प्रतिबंधित केले आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी कळवले आहे.