नागपूर : जागतिक महिला दिनी भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू उमेश यादव याला कन्यारत्न प्राप्त झाले. उमेश यादव दुसऱ्यांदा पिता झाला असून त्याने ट्वीटरवरून ही गोड बातमी दिली.

उमेश यादव सध्या चवथ्या कसोटीसाठी हैदराबादमध्ये आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारताला चषक जिंकण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे संघ तणावात सराव करीत आहे. यादरम्यान उमेश यावदला त्याला मुलगी झाल्याची बातमी कळली.
जागतिक महिला दिनीच कन्यारत्न प्राप्त झाले. उमेशने ट्वीटरवरून ‘ब्लेसड् विथ बेबी गर्ल’ असे ट्वीट करीत आनंदाची बातमी कळवली आहे. त्यानंतर उमेश आणि तान्या यांच्यावर चाहत्यांचा अक्षरश: अभिनंदनाचा पाऊस पडला आहे.

हेही वाचा – गोंदिया : बैलगाडा शर्यतीत सट्टा शौकिनांचा राडा; दगडफेकीसह पोलिसांना धक्काबुक्की

हेही वाचा – वर्धा : अन्नाची टळली नासाडी, भुकेल्यांना मिळाली पुरणपोळी; ‘अनिस’चा समाजोपयोगी उपक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेश यादव आणि तान्या वाधवा यांना १ जानेवारी २०२१ मध्ये पहिली मुलगी झाली होती. तर आता दुसरे कन्यारत्न प्राप्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच उमेशच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे घरात दु:खाचे वातावरण होते. मात्र, आता मुलगी झाल्यामुळे घरातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.