यवतमाळ : जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात कडक उन्हाच्या झळा तेथील वन्यजीवांनाही बसत आहेत. हे वन्यजीव पाणवठ्यावर वेळ घालवताना आढळत आहेत. येथे वाघांचे हमखास दर्शन होत असल्याने सध्या टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी वाढली आहे.

जिल्ह्यातील तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या समोर गेले आहे. त्यामुळे मनुष्यच नव्हे तर जंगलातील प्राण्यांनाही याचा त्रास होत आहे. या कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी टिपेश्वर अभयारण्यातील वाघसुद्धा पाण्यात डुबकी लावत आहे. नेमका हा क्षण टिपण्यासाठी रखरखत्या उन्हात आंध्र प्रदेश, मुंबई, पुणे तसेच यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील पर्यटक टिपेश्वर अभयारण्यात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – चंद्रपूर: विचित्र अपघातात आई व मुलाचा मृत्यू, मुलाच्या बंद पडलेल्या बुलेटमागे वडिलांची कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिपेश्वर अभयारण्यातील छोटा तलाव परिसरात वाघ ‘थंडा थंडा कुल कुल’ चा अनुभव घेताना यवतमाळ येथील पर्यटक डॉ. निखिल भागवते यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. टिपेश्वरमध्ये २२ च्या वर वाघांची संख्या आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ कमी असल्याने येथे वाघ हमखास दिसतात.