लोकसत्ता टीम

नागपूर: सायबर गुन्हेगारांचे जाळे राज्यभर पसरत असून आता त्यांचे लक्ष्य सुशिक्षत बेरोजगार युवक ठरत आहेत. अनेकदा सायबर फसवणुकीची माहिती नसणारे व्यक्ती सायबर गुन्हेगारांचे बळी ठरत होते. परंतु, आता सायबर गुन्हेगारांनी चक्क सॉफ्टवेअर इंजिनिअरला ‘पार्टटाईम जॉब’च्या जाळ्यात ओढून २० लाखाहून जास्त रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कोल्हापूर येथील रहिवासी असलेले प्रशांत शहापुरे (२९, बेसा) असे फसवणूक झालेल्या इंजिनिअरचे नाव आहे. ते एका नामांकित कंपनीत वरिष्ठ इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांना टेलिग्राम ॲपवर प्राजना जानकी नामक एका महिलेचा मेसेज आला. चित्रपटांचे घरबसल्या रेटिंग करण्याचा पार्टटाईम जॉब असल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा… नागपूर : महिला कर्मचाऱ्याला पैशाचे आमिष दाखवून व्यवस्थापकाने केली शारीरिक संबंधाची मागणी

संबंधित काम करण्यास शहापुरे यांनी इच्छा दर्शविली. संबंधित महिलेने एका इंटरनेट प्लॅटफॉर्मवर शहापुरे यांना नोंदणी करायला सांगितली व रेटिंगचे टास्क दिले. शहापुरे यांना पहिल्याच दिवशी हजार रुपये प्राप्त झाले. त्यानंतर त्यांना ‘सिनेस्तान ऑनलाईन अर्निंग’ या टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले. यामुळे शहापुरे यांचा महिलेवर विश्वास बसला. पुढील कामाच्या टास्कसाठी तिने त्यांना ११ हजार रुपये जमा करण्यास सांगितले व येथूनच शहापुरे आरोपींच्या जाळ्यात फसत गेले. शहापुरेंच्या टास्कचे पैसे एका व्हर्चुअल खात्यात जमा होत होते व तेथून ते बॅंकेत वळते करू शकत होते. त्यानंतर त्यांचे व्हर्चुअल खात्यातील रक्कम ‘निगेटिव्ह’मध्ये गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी ते पैसे भरले व त्यांच्या खात्यात नफ्यासह रक्कम दिसू लागली. त्यामुळे शहापुरे यांना विश्वास बसला.

हेही वाचा… नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत गुरुवारी एकाच मंचावर

५ मार्च ते ३० मार्च या कालावधीत त्यांनी टप्प्याटप्प्याने २० लाख ५४ हजार रुपये भरले; मात्र, त्यातील एकही पैसा मिळाला नाही. या रकमेच्या ४० टक्के रक्कम भरली तर पूर्ण रक्कम मिळेल असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ही रक्कम साडेसहा लाखांवर आली; मात्र त्याचवेळी टेलिग्राम ग्रुपचे नाव ‘इरोसनाऊ’ असे बदलण्यात आले. त्यांना समोरील व्यक्तींनी मुंबईतील कार्यालयाचा पत्तादेखील दिला.

हेही वाचा… नागपूर : सासूमुळे भरकटलेला संसार पुन्हा आला रुळावर; भरोसा सेलचे समुपदेशन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहापुरे यांनी तेथे जाऊन माहिती काढली असता तो इरोस इंटरनॅशनलचा पत्ता होता व त्यांच्याकडून कुठलेही रेटिंग करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे शहापूरे यांना लक्षात आले व त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्राजना जानकी, विक्रम व संजना या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.