वर्धा: शिक्षणात भरारी घेणाऱ्या संस्थांची देशात कमी नाहीच. राष्ट्रीय मानांकन होते तेव्हा या संस्थाचा परिचय होतो. पण लहान गावात स्थापन होत आंतरराष्ट्रीय भरारी घेणाऱ्या व मूल्यांकनात उजव्या ठरणाऱ्या संस्था मात्र मोजक्याच. तसेच सावंगी येथील विद्यापीठाबाबत म्हटले जाते. येथील दत्ता मेघे अभिमत विद्यापिठात ३५ पेक्षा अधिक देशातील विद्यार्थी शिकत असून वैद्यकीय शिक्षणात हे आंतरखंडीय केंद्र ठरत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सावंगी येथील दत्ता मेघे आयुविर्ज्ञान अभिमत विद्यापिठाचा २१ वा स्थापना दिन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी विद्यापिठाच्या वाटचालीबाबत तज्ञ व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. या विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. संदीप श्रीवास्तव हे म्हणाले की या विद्यापिठात बहुविद्याशाखीय शिक्षण दिल्या जाते. त्यामूळे जागतिक स्तरावर मान्यता लाभल्याने आज या ठिकाणी ३५ पेक्षा अधिक देशातील विद्यार्थी प्रत्यक्ष व दूरस्थ पद्दतीने शिक्षण घेत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठ, मेयाे क्लिनिक, जागतिक आरोग्य संघटना तसेच पन्नासहून अधिक आंतरराष्ट्रीय संस्था संशोधन व अन्य उपक्रमांसाठी या विद्यापिठाची संलग्न झाल्या आहे.
माजी कुलगुरू डॉ. राजीव बोरले म्हणाले की वर्धा व नागपूर परिसरात वैद्यकीयसह १० विविध शाखेचे अभ्यासक्रम चालविल्या जातात. तसेच रोबोटीक सर्जरी, अवयव प्रत्यारोपण व अन्य आधुनिक सुविधा देण्यासाठी मेघे विद्यापीठ हे एक देशातील प्रमुख आरोग्य केंद्र ठरले असल्याचे डॉ. बोरले योनी नमूद केले. दूरदृष्टी लाभलेल्या सक्षम नेतृत्वामुळे विद्यापीठास देशाबाहेरही नावलौकिक प्राप्त झाल्याचे डॉ. श्रीवास्तव यांनी नमूद केले.
प्रारंभी विद्यापीठाचे ध्वजारोहण करण्यात आले. विद्यापीठ गीत सादर झाल्यानंतर वाटचालीची माहिती देण्यात आली. सुमित उगेमुगे व अफसर पठाण यांनी सुत्र सांभळले. या प्रसंगी मुख्य समन्वयक डॉ. एस.एस.पटेल, कुलसचिव डॉ श्वेता काळे,संशोधन संचालक जहीर काझी, विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर,डॉ. अभय गायधने, परीक्षा नियंत्रक डॉ. सुनीता वाघ, अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक, अधिष्ठाता डॉ. भरत राठी, प्राचार्य डॉ. अनिल पेठे, अधिष्ठाता डॉ. केटीव्ही रेड्डी, डॉ. अल्का रावेकर, डॉ. वैभव अंजनकर, डॉ. अनिता वंजारी, डॉ. वैशाली ताकसांडे, प्राचार्य डॉ. रंजना शर्मा, प्राचार्य इंदू अलवाडकर, प्राचार्य अख्तरीबानो शेख, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. पूजा कस्तुरकर, अधिष्ठाता डॉ सुनील थितमे, डॉ. क्षितिज राज, डॉ. रघु्वीर, उपसंचालक अजय पुणवटकर व अन्य उपस्थित होते.