राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्‍तेत येण्‍याचे स्‍वप्‍न २०१४ मध्‍ये आणि त्‍यानंतर २०१९ मध्‍येही पाहिले होते, पण त्‍यांचे स्‍वप्‍न पूर्ण होऊ शकत नाही. कारण राष्‍ट्रवादी काँग्रेस हा महाराष्‍ट्रव्‍यापी पक्षच नाही, अशी टीका उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सायंकाळी येथे प्रसार माध्‍यमांशी बोलताना केली.

येथील नियोजन भवनात आयोजित खरीपपूर्व बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. ते म्‍हणाले, शरद पवारांना खूप लोकांचा अनुभव आहे. त्‍यामुळे शरद पवार काहीही बोलू शकतात. पण, आता त्‍यांचा पक्ष एकसंघ ठेवण्‍यासाठी त्‍यांना जी कसरत करावी लागत आहे, ही कसरत पाहिल्‍यानंतरच त्‍यांनी इतर पक्षांबद्दल बोलावे की न बोलावे, याचा विचार त्‍यांनीच केला पाहिजे.

हेही वाचा >>> “संजय राऊत म्हणजे सकाळचा भोंगा, आपला दवाखान्यात त्यांच्यावरच आधी उपचार होणार”, खासदार श्रीकांत शिंदे यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपची दोनवेळा फसवणूक केली, या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्‍या वक्‍तव्‍यावर प्रतिक्रिया विचारली असता, फडणवीस यांनी आपण आंबेडकर यांच्‍या वक्‍तव्‍यावर काय बोलणार, अजित पवारांची प्रतिक्रिया घेतली पाहिजे, असे सांगितले. भाजपची कुणीही फसवणूक करू शकत नाही, असेही ते म्‍हणाले. पीक कर्ज वाटपाच्‍या वेळी शेतकऱ्यांना सीबील मागणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करण्‍याचे निर्देश आपण दिले आहेत. शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.