चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रातील मूल तालुक्यातील टेकाडी येथे सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्मच्या बाजुच्या शेतातील झुडपात बिबट मृतावस्थेत मिळाल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. बिबट्या शेतातील झुडपात दडुन असल्याची माहिती स्थानिक वनरक्षक यांना मिळाली.

चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वनाधिकारी तलमले, सहाय्यक उपवनसंरक्षक तरसे, सावली वनपरिक्षेत्र अधिकारी धुर्वे यांच्या सुचनेनुसार बिबट्याला पकडण्याचा निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर टी.टी.सी.चे डॉक्टर तथा अतिशीघ्र कृती दल चे कर्मचारी, वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्था मूलचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले.

बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे पकडण्याची तयारी करण्यात आली, परंतु झुडपात पहाणी करीत असतांना तो बिबट आधीच मृत झाला असल्याचे आढळले. ही माहिती वरिष्ठ वनाधिकारी यांना देण्यात आली व त्यांचे मार्गदर्शनात मृत बिबटला सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले. डॉ. कुंदन पोडचलवार यांनी त्या मृत बिबट्याचे सहाय्यक उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे समक्ष शवविच्छेदन केले नंतर त्याचे दहन करण्यात आले.

यावेळी डॉ. कुंदन पोडचलवार, क्षेत्र सहाय्यक एन.एस. सिडाम, वनरक्षक एस.डब्लू. बोनलवार, वनरक्षक लंकेश आखाडे, अतीशीघ्र कृती दलाचे शुटर अविनाश फुलझेले, किशोर डांगे, मनोज चावरे, अंकीत पडगेलवार, संजीवन पर्यावरण संस्था मूल चे उमेशसिंह झिरे, तरूण उपाध्ये, तन्मयसिंह झिरे, हौशिक मंगर अक्षय दुम्मावार टेकाडी पीआरटीची टीम व सहाय्यक वनमजूर उपस्थित होते.