गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी एकमुखी मागणी विविध संघटनांनी केली. दुसरीकडे बजरंगदलाने आरोपी हा संघटनेचा सदस्य नसल्याचा दावा केला आहे.

दहावीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी एटापल्ली तालुक्यातून आलापल्ली येथे आलेल्या अल्पवयीन मुलीवर रविवारी दोघांनी अत्याचार केला. यातील एक आरोपी ओळखीचा असल्याने पीडिता विश्वास ठेऊन त्याच्यासोबत खोलीवर गेली होती. दरम्यान दुसरा आरोपी त्याठिकाणी आला व पीडितेला गुंगीचे औषध दिले. त्यांनतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. घडलेल्या प्रकारामुळे हादरलेल्या मुलीने घरी जाऊन आपबिती सांगितली. त्यांनतर आरोपींविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

हेही वाचा – बुलढाणा : १५ जूनपर्यंत ७० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात; विमा कंपनीचे लेखी आश्वासन

पोलिसांनी नेहाल कुंभारे व रोशन गोडसेलवार या दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हे दाखल केले. याप्रकरणी शेकाप नेत्या जयश्री वेळदा तसेच विविध समाजसेवी संघटनांनी निषेध नोंदवून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही आरोपी राजकीय संघटनेशी संबंधित असल्याबाबत संघटनांनी फेटाळून लावले आहे.

हेही वाचा – नितीन गडकरी म्हणतात, “बँकांचे सर्वाधिक कर्ज बुडवणारे ग्राहक श्रीमंत गटातील”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीचा बजरंगदलाशी संबंध नाही

आलापल्ली येथील अत्याचार प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय असून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. या प्रकरणामधील आरोपी रोशन गोडसेलवार हा बजरंगदलाचा कार्यकर्ता आहे, असे माध्यमांमध्ये लिहून आले. यात सत्यता नसून त्याचा बजरंगदलाशी कोणताही संबंध नाही. संघटनेने त्याला कोणतेही सदस्यत्व किंवा पद कधीच दिलेले नव्हते, असा दावा बजरंगदल जिल्हा सहसंयोजक देवेंद्र खतवार यांनी केला आहे.