लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीत १ जानेवारी ते २४ जुलै २०२३ पर्यंतच्या काळात डेंग्यूचे तब्बल ६१ रुग्ण आढळले असून त्यापैकी निम्म्याहून जास्त रुग्ण हे गेल्या महिन्याभरातील आहेत. डेंग्यूचे रुग्ण शहरात वाढत असल्याने आता नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागावर त्यावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आवाहन आहे.

नागपूरच्या विजयनगर भागात डेंग्यूसदृश आजाराने एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू डेंग्यूने असल्याचा नातेवाईकांचा दावा होता. परंतु, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निरीक्षणात या मृत्यूचे कारण वेगळे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ३६ संशयितांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ३ रुग्णांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले.

आणखी वाचा-गडचिरोली: दोन जहाल नक्षाल्यांचे आत्मसमर्पण

नवीन रुग्णांमध्ये दोन १४ वर्षीय मुलांसह एका २८ वर्षीय व्यक्तीचाही समावेश आहे. त्यातच नागपूर शहरात आजपर्यंत आढळलेल्या ६१ पैकी निम्म्याहून जास्त रुग्ण गेल्या महिन्याभरातील आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात कीटकनाशक फवारणीसह डेंग्यू आजाराबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे. डेंग्यूचे लक्षणे दिसताच तातडीने उपचार घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात एवढे रुग्ण आढळल्याच्या वृत्ताला महापालिकेच्या अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

आणखी वाचा- नागपूर: लेखक काचमहालात बसण्यासाठी नाही, तो व्यवस्थेला प्रश्न विचारणारच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डेंग्यू वाढण्याचे कारण…

शहरातील बऱ्याच रिकाम्या भूखंडावर पाणी साचल्याने डासांची संख्या वाढली आहे. तर दुसरीकडे शहरातील अनेक घरातील कुलर अद्यापही काढण्यात आले नाहीत. त्यामुळे या कुलरच्या पाण्यातही डासांची संख्या वाढल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोंदवण्यात आले आहे. महापालिकेकडून डेंग्यू नियंत्रणासाठी सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्यात आली आहे.