प्रशांत देशमुख, लोकसत्ता वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारे तसेच त्यांचे अनुयायी गांधी विचारांची कितीही थट्टा उडवीत असले तरी फडणवीस यांना मात्र गांधी वंदनीय असल्याचे ते सांगतात. म्हणून त्यांचे गुरुवर्य असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्प तडीस जावे यासाठी त्यांनी आज बापू कुटीत बापूंना अभिवादन करीत आशीर्वाद घेतले. आणखी वाचा-इंग्रजी गाणे वाजवल्याने मनसे पदाधिकारी संतापले; “मराठी गाणे वाजवले नाही तर…” ओबीसी मोर्चास आज फडणवीस यांच्या शुभहस्ते सेवाग्राम आश्रमातून प्रारंभ झाला.त्यावेळी त्यांनी आश्रमाच्या अभिप्राय वहीत आपले टिपण लिहले.जयंती निमित्त गांधीजींचे स्मरण करतांना ' ज्या दरिद्र नारायणाची सेवा करण्याचे व्रत त्यांनी घेतले होते त्याच दरिद्र नारायणाच्या उत्थाना करिता मा.प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवत समाजातील शेवटच्या रांगेतील बसलेल्या नागरिकांसाठी सेवा करण्याचा संकल्प पुनश्च घेत आहोत.महात्मा गांधींनी याच संकल्प पूर्तीचा आशीर्वाद द्यावा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.भारत माता की जय ' .असे फडणवीस यांनी नमूद केले आहे.