वृद्धाश्रमाची आवश्यकता पडणे हे समाजासाठी चिंताजनक आहे. मात्र ज्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी अशा संस्था उभ्या रहाव्यात. कुठलाच आधार नसणाऱ्यांना अशा उपक्रमातून आधार मिळतो. २५ वर्षे अनुदान नसताना संस्था चालविणे कठीण आहे. मात्र माजी मंत्री शोभाताईं फडणवीस यांच्या सेवाभावामुळेच ही संस्था अविरत चालवली आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नागपूर: रसोईची सुरूवात राष्ट्रगीताने आणि..

मातोश्री वृद्धाश्रमच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेच्या अध्यक्ष शोभाताई फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार किर्तिकुमार भांगडीया, काँग्रेस आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, संस्थेचे सचिव अजय जयस्वाल, शेलेश बागला उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मातोश्री वृद्धाश्रमाच्या रोप्य महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अतिशय आनंद आहे. येथील कार्यपद्धती आणि वातावरण समजून घेतले. हा एक केवळ वृद्धाश्रम नाही तर येथे एक परिवार तयार झाला आहे. शोभाताईंचे नेतृत्व संघर्षातून उभे राहिले आहे. समाज हाच परिवार मानून शोभाताईंनी सेवा केली आहे. वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानंतरही शोभाताईंची ऊर्जा आणि उत्साह कायम आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून काम करण्याची त्यांची ऊर्जा दिसते. समाजाला काहीतरी परत करण्याची इच्छा निर्माण होणे हा भारतीय संस्कृती मधला एक चांगला संस्कार मानला जातो. यावेळी २५ दानशूर व्यक्तींचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व दानशूर व्यक्तींचे त्यांनी मनापासून आभार. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी या वृद्धाश्रमाला मदत केली आहे. समाजाला काही देणे लागतो या भावनेतून वृद्धाश्रम सुरू आहे. आचारसंहिता सुरू असल्यामुळे येथे काही घोषणा करणार नाही. मात्र ज्या मागण्या करण्यात आल्या आहे, त्यावर नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल.

हेही वाचा >>>नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरही वाढीव प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा आदेश बेपत्ता!

सीएसआर फंडच्या माध्यमातून या वृद्धाश्रमाला ५० लक्ष रुपये मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. ज्येष्ठ व्यक्तिंचे आशीर्वाद सातत्याने मिळत राहो, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच आमदार किर्तिकुमार भांगडीया यांनी २५ लाखाची मदत जाहीर केल्याचे उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संरक्षण भिंत बांधून देण्याचे तसेच नवीन वृद्धाश्रमाला मदत करण्याचे आश्वासन दिले. आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वागतपर भाषणात उपमुख्यमंत्री यांच्याकडे महाकाली मंदिर बांधकाम तसेच रामनगर नवीन पोलिस ठाणे, धानोरा बेरेज, न्यायालय इमारत, दीक्षाभूमी साठी निधीची मागणी केली. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी वृद्धाश्रमाच्या कामाची, तसेच आजवर आलेल्या अडचणीवर मात करीत सर्वांचा कशाप्रकारे सांभाळ केला ते सांगितले. संचालन राजश्री मार्कंडेवार यांनी तर आभार अजय जयस्वाल यांनी मानले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister fadnavis is of the opinion that he will try to get rs 50 lakh for the old age home rsj 74 amy
First published on: 26-01-2023 at 18:58 IST